• Sun. Jul 20th, 2025

भाजप युवा मोर्चाच्या वतीने राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

ByMirror

Feb 9, 2024

वक्तव्याचा तेली समाज व ओबीसी समाजाच्या वतीने निषेध

अहमदनगर (प्रतिनिधी)- ओबीसीच्या जातीय मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप केल्याच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चाच्या वतीने काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे तेलीखुंट येथे दहन करण्यात आले. तर वारंवार पंतप्रधानांबद्दल चुकीचे वक्तव्य खपवून न घेता जशास तसे उत्तर देण्यासाठी काँग्रेस विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. तर या वक्तव्याचा तेली समाज व ओबीसी समाजाच्या वतीने देखील निषेध व्यक्त करण्यात आला.


या आंदोलनात भाजपचे माजी शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र (भैय्या गंधे), युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष मयूर बोचुघोळ, प्रकाश सैंदर, विजय काळे, हरिभाऊ डोळसे, अरविंद दारुणकर, ज्ञानेश्‍वर काळे, सोमनाथ देवकर, देविदास साळुंखे, चेतन डोळसे, दिलीप साळुंके, सागर लोखंडे, स्वरुप नागले, संतोष मेहत्रे, संतोष हजारे, गणेश म्हस्के, विक्रम शिंदे, दिलीप दारूणकर, पप्पू गर्जे, बंटी ढापसे, गोपाल वर्मा, सुमित बटुळे, स्वप्निल बेद्रे, ॲड. ऋदेश अंबाडे, आकाश सोनवणे, ओंकार लेंडकर, सोमनाथ जाधव, सुजित खरमाळे, करण कराळे, सुजय मोहिते, अमोल निस्ताने, अभिजीत म्हस्के, श्रेयस नराळ, बाबासाहेब सानप, प्रकाश जोशी, यश शर्मा, राहुल जामगावकर, सुजय मोहिते, बाळासाहेब भुजबळ, अनिल निकम, ज्ञानेश्‍वर धिरडे, पप्पू गर्जे, गोपाल वर्मा, सुमित बटुळे, स्वप्निल बेद्रे, कालिंदीताई केसकर आदी सहभागी झाले होते.


महेंद्र (भैय्या) गंधे म्हणाले की, राहुल गांधी यांना स्वतःच्या जातीची माहिती नसून, पंतप्रधानांची जात पाहत आहे. पंतप्रधानांच्या जातीवर बोलण्याचा त्यांना हक्क नाही. चुकीचे वक्तव्य भाजप यापुढे खपवून घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मयूर बोचुघोळ म्हणाले की, राजकारणात जातीय मुद्द्यांचा आधार देऊन समाजाला व भाजपला टार्गेट केले जात आहे. समाजामध्ये दुही निर्माण करून सत्ता मिळवण्याची काँग्रेसचे षडयंत्र आहे. ब्रिटिशांप्रमाणे फोडा आणि राज्य करा ही रणनीती ते आचरणात आणत असून, काँग्रेसच्या नेत्यांनी गलिच्छ राजकारणाची पातळी गाठली असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *