युवकांचा उत्स्फूर्त सहभाग; 42 हून अधिकांनी दिले रक्तदान
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील जगदंबा तरुण मंडळ, शिवमुद्रा ग्रुप व माजी सभापती मनोज कोतकर यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्र उत्सवानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमासह सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर सातव्या माळेनिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले. या रक्तदान शिबिराला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच सामाजिक जाणिवा जागवणाऱ्या उपक्रमांना देखील यंदाच्या उत्सवात विशेष महत्त्व देण्यात आले. 42 हून अधिक तरुणांनी रक्तदान केले. याप्रसंगी माजी सभापती मनोज कोतकर, बाळासाहेब कोतकर, शाम कोतकर, अजित कोतकर, अण्णा शिंदे, भरत मतकर, नवनाथ कोतकर, राघू ठुबे, बंटी विरकर, ओंकार कोतकर, अक्षय कोतकर, सुहास साळुंके, रणजीत ठुबे, अजिंक्य कोतकर, शुभम कोतकर, सौरभ मतकर, शिवम राऊत, प्रसाद जमदाडे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मनोज कोतकर म्हणाले की, दरवर्षीप्रमाणे यंदाही जगदंबा तरुण मंडळ व शिवमुद्रा ग्रुपच्या माध्यमातून नवरात्र उत्सवानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यात रक्तदान शिबिर दरवर्षी घेण्यात येतो. गरजूला नवजीवन देणारे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचवण्यासाठी या रक्तदानाचा उपयोग होतो. धार्मिक सोहळ्यांना सामाजिक उपक्रमाची जोड देणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी अर्पण ब्लड बँकेचे डॉक्टर व सदस्य यांनी मोलाचे सहकार्य केले. युवकांच्या उत्साही सहभागामुळे हा सामाजिक उपक्रम पार पडला.
