• Sun. Mar 30th, 2025

डोंगरे बहुद्देशीय संस्थेला भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम ग्राम गौरव पुरस्कार जाहीर

ByMirror

Mar 22, 2025

संस्थेच्या सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य, शैक्षणिक व पर्यावरण क्षेत्रातील कार्याची दखल

नगर (प्रतिनिधी)- सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य, कला, क्रीडा, शैक्षणिक व पर्यावरण क्षेत्रात निस्वार्थ भावनेने उत्कृष्ट काम करणाऱ्या नगर जिल्ह्यातील स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेला जळगाव येथील टी.एन. हेल्प मल्टिपर्पज सोसायटीच्या वतीने माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम ग्राम गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. जळगाव येथे 13 एप्रिल रोजी संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित केले जाणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. जावेद शेख यांनी दिली.
स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था नगर तालुक्यासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध क्षेत्रात कार्य करत आहे. संस्थेच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, कला, क्रीडा व धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य सुरु आहे. ग्रामीण भागात वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनासाठी विविध कार्यक्रम घेऊन संस्थेने पर्यावरण संवर्धनासाठी मोठी जनजागृती केली आहे. स्त्री जन्माचे स्वागत, स्वच्छता अभियान, महिला सक्षमीकरण, मतदार जागृती, जलसंधारण जागृती मोहिम व रक्तदान शिबीर व्यापक स्वरुपात राबविण्याचे कार्य सुरु आहे. तसेच युवकांसाठी व्यसनमुक्तीवर विविध उपक्रम घेऊन जनजागृती केली जात आहे. राज्यस्तरीय काव्य संमेलनाच्या माध्यमातून नवोदित कवींना प्रोत्साहन देऊन, विविध लेखकांचे पुस्तक प्रकाशन करुन साहित्य चळवळीत योगदान सुरु आहे. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून गावपातळीवर ग्रामस्थांना आधार देण्याचे कार्य सुरु आहे. विविध स्पर्धा, महिला बचत गट मेळावे, काव्य व युवा संमेलन घेऊन समाजाला दिशा देण्याचे कार्य संस्थेच्या माध्यमातून सुरु आहे. या कार्याची दखल घेऊन डोंगरे संस्थेला टी.एन. हेल्प मल्टिपर्पज सोसायटीच्या वतीने माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम ग्राम गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
मा. संपादक कृपया प्रसिध्दीसाठी…………………..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *