नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील बशीर मगबुल शेख यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 77 वर्षाचे होते.श्री दुर्गादेवी विद्यालय ढवळपुरी, ता. पारनेर येथील प्राचार्य आदम शेख व आसिफ शेख यांचे ते वडिल होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, दोन बहिणी, दोन मुले, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर गावातील कब्रस्तानमध्ये शोकाकुळ वातावरणात अंत्यविधी करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
निमगाव वाघा येथील बशीर शेख यांचे निधन
