श्री संत तुकाराम महाराज युवा संगीत अलंकार पुरस्काराने खासदार लंके यांच्या हस्ते होणार सन्मान
नगर (प्रतिनिधी)- गायन व संगीत क्षेत्रातील कलावंत राहुल पालवे यांना स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय युवा संगीत अलंकार पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
निमगाव वाघा (ता. नगर) येथे आषाढी एकादशी व राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त रविवारी (दि.6 जुलै) होणाऱ्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात पालवे यांना खासदार निलेश लंके यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. या कार्यक्रमासाठी विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड, साहित्यिक तथा प्राचार्या गुंफाताई कोकाटे, नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
माका (ता. नेवासा) या ग्रामीण भागातील राहुल पालवे यांनी गायन व संगीत क्षेत्रात आपले नावलौकिक मिळवले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे गायनाचे कार्यक्रम होत असतात. आपल्या कलाशैलीने त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे.
त्यांच्या कला क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय युवा संगीत अलंकार पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याची माहिती डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांनी दिली. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पालवे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
मा. संपादक कृपया प्रसिध्दीसाठी……………….