• Tue. Jul 1st, 2025

भिंगार छावणी परिषदेच्या वतीने हरदिनमॉर्निंग ग्रुप पुरस्काराने सन्मानित

ByMirror

Oct 5, 2024

स्वच्छता अभियान व मॅरेथॉन मधील सक्रीय सहभागाबद्दल सन्मान

अहमदनगर (प्रतिनिधी)- आरोग्य व पर्यावरण संवर्धन चळवळीत सक्रीय असलेल्या हरदिनमॉर्निंग ग्रुपला भिंगार छावणी परिषदेच्या वतीने पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. छावणी परिषदने आयोजित केलेल्या स्वच्छता ही सेवा उपक्रमातंर्गत स्वच्छता अभियानात सक्रीय सहभाग व मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतल्याबद्दल ग्रुपला सन्मानित करण्यात आले.


भिंगारमध्ये झालेल्या छावणी परिषदेच्या कार्यक्रमात पद्मश्री पोपट पवार यांच्या हस्ते ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी छावणी परिषदेचे अध्यक्ष ब्रिगेडियर रसोल डिसूजा, मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे, आंतरराष्ट्रीय धावपटू पूजा वराडे, हरदिनचे रमेश वराडे, दिलीप गुगळे, सर्वेश सपकाळ, रतन मेहेत्रे, अभिजीत सपकाळ, धावपटू जगदिप मक्कर, छावणी परिषदेचे रमेशराव साके, गणेश भोर, अभियंता महेंद्र सोनवणे, अशोक फुलसौंदर, योगेश बोरुडे, छावणी परिषद हॉस्पिटलचे आरएमओ गीतांजली पवार, मुख्याध्यापक संजय शिंदे, राजेंद्र भोसले आदी उपस्थित होते.


पद्मश्री पोपट पवार यांनी मोठ्या संख्येने महिला पुरुष एकत्रित येऊन हरदिनमॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक व पर्यावरण क्षेत्रात देत असलेल्या योगदानाचे कौतुक केले. हरदिनमॉर्निंग ग्रुप वर्षभर वृक्षरोपण संवर्धनाबरोबरच स्वच्छतेचे उपक्रम राबवित आहे. तर सदृढ आरोग्यासाठी योगा-प्राणायाम, हास्य क्लबद्वारे आरोग्य चळवळ चालवीत असल्याची माहिती संजय सपकाळ यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *