नाशिक येथे होणार सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरण क्षेत्रातील कार्याबद्दल साठे यांचा सन्मान
नगर (प्रतिनिधी)- भोयरे पठार (ता. नगर) येथील सामाजिक कार्यकर्ते तथा शिक्षक अविनाश बाबासाहेब साठे यांना सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल नाशिक येथील भावना बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने राष्ट्रीय एकात्मता आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
संस्थेचे सचिव महेश मुळे यांनी साठे यांच्या पुरस्काराची घोषणा केली आहे. अविनाश साठे सातत्याने सामाजिक कार्य करत आहे. तसेच शिक्षक म्हणून काम करताना भविष्यातील सक्षम पिढी घडविण्यासाठी विविध उपक्रम राबवित आहे. पर्यावरण संवर्धानासाठी देखील वृक्षारोपणाचे उपक्रमाबरोबर विविध सामाजिक उपक्रम ते राबवित असतात. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय एकात्मता आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
रविवारी (दि.5 जानेवारी) सकाळी नाशिक येथील टिळक रोड, औरंगाबादकर सभागृहात हा पुरस्कार त्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे. सदर पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.