शैक्षणिक, सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील योगदानाची दखल
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शालेय शिक्षक अविनाश साठे यांच्या सामाजिक क्षेत्र व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल जळगाव येथील आदिलशहा फारुकी बहुउद्देशीय संस्था यांच्यामार्फत लाल बहादुरशास्त्री राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
23 नोव्हेंबर रोजी जळगाव या ठिकाणी या पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. अविनाश साठे शैक्षणिक, सामाजिक व क्रीडा क्षेत्रात योगदान देत आहे. ग्रामीण भागातील भोयरे पठार या गावचे असून, सरस्वती प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर केडगाव याठिकाणी कार्यरत आहेत. सामाजिक कार्यात त्यांचे सातत्यपूर्ण कार्य सुरु असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत अनेक विद्यार्थी घडले आहे. स्पर्धा परीक्षा, राज्यस्तरीय व राष्ट्रीय क्रीडा क्रीडा स्पर्धेत त्यांनी यश मिळवले आहे. यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना सदर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
