• Thu. Mar 13th, 2025

वार्ताहर अनिल रोडे यांचे निधन

ByMirror

Sep 12, 2023

अहमदनगर (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील वार्ताहर अनिल अशोकराव रोडे यांचे मंगळवारी (दि.12 सप्टेंबर) पहाटे शहरातील आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान निधन झाले. ते 37 वर्षाचे होते.


ते काही दिवसापासून आजारी होते. गोणेगाव (ता. नेवासा) हे त्यांचे मुळगाव असून, ते वार्ताहर म्हणून सर्वांना सुपरिचित होते. त्यांनी विविध वृत्तपत्रांसाठी वार्तांकनाचे काम केले. त्यांचा सर्वांशी दांडगा जनसंपर्क होता. त्यांच्या निधनाने कुटुंबासह मित्र परिवार व गावात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्‍चात आई, तीन विवाहित बहिणी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *