• Mon. Jul 21st, 2025

अंधाच्या पत्नीला फूस लावून पळविले

ByMirror

Feb 4, 2024

पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करुन घेण्यासाठी अंध व्यक्तीची पोलीस अधीक्षकांकडे धाव

आरोपीवर दिव्यांग अधिनियम 2016 नुसार कारवाई करण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- अंधपणाचा गैरफायदा घेऊन बायकोस शेजारच्या व्यक्तीने फूस लावून पळविले असताना व बायकोला पळविणारा व्यक्ती जीवे मारण्याची धमकी देत असताना पोलीस स्टेशनला तक्रार घेतली जात नसल्याने कोल्हार येथील त्या अंध व्यक्तीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे धाव घेऊन सदर व्यक्तीवर कारवाई करुन पत्नीची सुटका करण्याची मागणी केली आहे.


कोल्हार (ता. राहता) येथे जन्मजात दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या तक्रारदार पूर्णतः आई-वडील व पत्नीवर अवलंबून आहे. पत्नी मोलमजुरी करून कुटुंबीची उपजीविका भागवत होती. शेजारी राहत असलेल्या व्यक्तीच्या पत्नीचे निधन झाल्यानंतर तो अंध व्यक्तीच्या घरी जेवणासाठी येत होता.

तो व्यक्ती कुटुंबीयांच्या पूर्वीपासून ओळखीचा असल्याने त्याच्यावर विश्‍वास ठेवण्यात आला. मात्र त्या व्यक्तीने अंध पतीचा फायदा घेऊन तिच्या पत्नीशी जवळीक साधली व पत्नीस भुरळ लावून पळवून नेले असल्याचा आरोप अंध व्यक्तीने केला आहे.


लोणी पोलीस स्टेशनला तक्रार करण्यास गेले असता, तेथून हाकलून लावण्यात आले. पत्नीला घेऊन जाणाऱ्या व्यक्तीस संपर्क केला असता, त्याने जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत देखील पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दिला असता पोलिसांनी तक्रार घेतली नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे. सदर व्यक्ती विरोधात दिव्यांग अधिनियम 2016 नुसार कारवाई करावी, अजामीन पत्र गुन्हा नोंदवत त्याच्यावर ॲट्रॉसिटीचे कलम लावण्याची मागणी अंध व्यक्तीने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *