बचत गटांना सहभागी होण्याचे आवाहन
11 ते 14 जानेवरी दरम्यान रंगणार सोहळा
अहमदनगर (प्रतिनिधी)- बचत गटातील महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्याच्या उद्देशाने शहरात चार दिवसीय आयोजित करण्यात आलेल्या सहाव्या राज्यस्तरीय सावित्री ज्योती महोत्सवामध्ये बचत गटाच्या वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात येणार असल्याची माहिती मुख्य संयोजक ॲड. महेश शिंदे यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, महिला स्वयंसहाय्यता बचत गट, आरोग्य क्षेत्रात कार्य करणारे वैद्यकीय तज्ञ, लोक जागृती करणारे लोक कलावंत, साहित्यिक, कवी यांना एका मंचावर बोलवून सावित्री ज्योती महोत्सवात सामाजिक प्रश्नांवर चर्चा घडवून आनली जाणार आहे. हा सोहळा 11 जानेवारी रोजी गुलमोहर रोड येथील कोहिनूर मंगल कार्यालयात होणार आहे. यामध्ये सांस्कृतिक उपक्रमाबरोबरच सामाजिक उपक्रमाचे नियोजन देखील करण्यात आलेले आहे.
दरवर्षी महिला सक्षमी करण्यासाठी जय युवा अकॅडमी, महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा कार्यालय, नेहरू युवा केंद्र, अहमदनगर महानगरपालिका, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, जिल्हा परिषद, समाज कल्याण विभाग, समाजकार्य महाविद्यालय, जय असोसिएशन ऑफ एनजीओ महाराष्ट्र राज्याच्या वतीने सावित्री ज्योती महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असून, या महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन माविमचे जिल्हा समन्वयक अधिकारी संजय गर्जे, स्वागताध्यक्ष सुहास सोनवणे व पोपट बनकर यांनी केले आहे.
महिला स्वयंसहाय्यता बचत गट हे आर्थिक उन्नतीसाठी प्रभावी माध्यम आहे. बचत गटाच्या माध्यमातून विविध कला कौशल्य घेऊन उद्योग व्यवसाय उभा करीत आहे. या बचत गटाच्या उत्पादनाला वाव व बाजारपेठ मिळण्याच्या उद्देशाने विविध महिला बचत गटाच्या उत्पादनांचे स्टॉल लावण्यात येणार आहे. 11 ते 14 जानेवरी दरम्यान होणाऱ्या या महोत्सव यशस्वी करण्यासाठी दिनेश शिंदे, विद्या तन्वर, आरती शिंदे, स्वाती डोमकावळे, जयश्री शिंदे, कांचन लद्दे, अश्विनी वाघ आदी प्रयत्नशील आहेत. महोत्सवात सहभागी होण्यासाठी बचत गटांनी 9921810096 व 7744011011 या क्रमांकावर संपर्क साधून नाव नोंदणी करण्याचे सांगण्यात आले आहे.