नगर (प्रतिनिधी)- शहरातील भोसले आखाडा येथील रहिवासी अमिधा विकास तिवारी हिने प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथे झालेल्या परेड मध्ये कर्तव्य पथावर (राजपथ) उत्कृष्ट संचलन केले. सध्या बिर्ला बालिका विद्यापिठात ती शिक्षण घेत आहे.

अमिधा तिवारी हिने बिर्ला बालिका विद्यापीठ 66 व्या आरडीसी दलाच्या 51 कॅडेट्सचे नेतृत्व केले. ती गिराज किशोर तिवारी यांची ती नातू व विकास तिवारी यांची मुलगी आहे. कठीण प्रशिक्षण घेऊन तिने यशस्वीपणे उत्कृष्ट संचलन करण्याचे ध्येय साध्य केले आहे. 1 जानेवारी पासून ती परेड शिबिराच्या तयारीसाठी सराव करत होती. ती सेंट मायकलची माजी विद्यार्थिनी असून, सध्या ती बिर्ला बालिका विद्यापिठात इयत्ता नऊवी मध्ये शिकत आहे. कर्नल विवेक तिवारी यांनी याबद्दल तिला शुभेच्छा दिल्या.