• Sat. Sep 20th, 2025

पदोन्नती झाल्यानंतर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करा

ByMirror

Oct 31, 2023

पदवीधर शिक्षक महासंघाची मागणी

तालुका अंतर्गत समायोजन होऊन शिक्षकांची गैरसोय होणार नाही -महेश डोईफोडे

अहमदनगर (प्रतिनिधी)- सन 2022-23 च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन पदोन्नती झाल्यानंतर करण्याची मागणी पदवीधर शिक्षक महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना देण्यात आल्याची माहिती पदवीधर शिक्षक महासंघाचे राज्य सरचिटणीस महेश डोईफोडे यांनी दिली.


केंद्रप्रमुख व पदवीधर शिक्षक पदोन्नतीसाठी तात्पुरत्या याद्या व त्याबाबतीत माहिती संकलित करण्याचे काम जिल्हा परिषद प्रशासनाने सुरू केले आहे. केंद्रप्रमुख व पदवीधर शिक्षक पदोन्नती झाल्यानंतर शिक्षकांच्या जागा रिक्त होतील व त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन तालुका अंतर्गत होईल.

शिक्षकांची गैरसोय होणार नसल्याची भावना पदवीधर शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष तुषार दळवी, कार्याध्यक्ष संतोष शिंदे व कोषाध्यक्ष बाळासाहेब दातीर यांनी व्यक्त केली आहे.



केंद्रप्रमुख व पदवीधर शिक्षक पदोन्नती झाल्यानंतर शिक्षकांच्या जागा रिक्त होणार आहे. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन तालुका अंतर्गत होईल व शिक्षकांची गैरसोय होणार नाही. -महेश डोईफोडे (राज्य सरचिटणीस, पदवीधर शिक्षक महासंघ)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *