नगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील आरीज फिरोज शेख याने रमजानचा पहिला रोजा (उपवास) केला. वयाच्या 6 व्या वर्षी त्याने रमाजानच्या पवित्र महिन्यात अन्न, पाणी विना उपवास केला आहे.
तब्बल तेरा तासांहून अधिक काळ त्याने निर्जली रोजा ठेवला होता. आरीज हा नासिर शेख यांचा नातू आहे. त्याने केलेल्या रोजाबद्दल नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी त्याचे कौतुक करुन अभिनंदन केले.