• Thu. Jul 2nd, 2026

Mirrornews24

Marathi News

आम आदमी पार्टीचा वकील आंदोलनास पाठिंबा

ByMirror

Feb 9, 2024

सध्याची परिस्थिती पाहता अराजकता दिसून येते -राजू आघाव

वकील संरक्षण कायदा लागू करण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- सध्या महाराष्ट्र राज्याची परिस्थिती ही बिहार सारखी दिसून येते. कायद्याची भय, भीती गुन्हेगारांना राहिली नाही. सगळीकडेच अराजकता दिसून येते, शासकीय अधिकारी, डॉक्टर्स आणि आता न्याय देण्यासाठी कार्यरत असणाऱ्या वकिलांवर प्राण घातक हल्ले होत आहे. राहुरीमध्ये ॲड. मनीषा आढाव व ॲड. राजाराम आढाव या पती-पत्नी विधीज्ञांच्या अपहरण करून निर्घुण खून करण्यात आला. ही अतिशय निंदनीय घटना असल्याचे प्रतिपादन आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजू आघाव यांनी केले.


आम आदमी पार्टीच्या वतीने अहमदनगर शहर वकील संघटनेच्या वतीने सुरु असलेल्या आंदोलनास पाठिंबा देऊन वकील संरक्षण कायदा लागू करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी आघाव बोलत होते. यावेळी आपचे शहर जिल्हाध्यक्ष भरत खाकाळ, जिल्हा समन्वयक प्रा. अशोक डोंगरे, महिला आघाडी अध्यक्षा ॲड. विद्या शिंदे, इंजि. प्रकाश फराटे, नामदेव ढाकणे, सामाजिक कार्यकर्ते सुहासराव सोनवणे, ॲड. महेश शिंदे, पोपट बनकर, माहेर संस्थेच्या अध्यक्षा रजनीताई ताठे आदींच्या शिष्टमंडळाने शहर बारचे सदस्या ॲड. अनिता दिघे व रवींद्र शितोळे यांच्याकडे पाठिंबाचे पत्र दिले.


प्रा. अशोक डोंगरे म्हणाले की, वकील संरक्षण कायदा होणे गरजेचे आहे. विधीज्ञ आढाव दांपत्यांचा खटला जलदगती न्यायालयात चालविला जावा जेणेकरून लवकर न्याय मिळेल. सदर खटला विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नेमणूक केली जावी, या मागण्यासाठी आम आदमी पार्टी जिल्ह्यातील सर्व वकील बांधवांसोबत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सामाजिक कार्यकर्ते सुहासराव सोनवणे यांनी न्यायालयीन प्रक्रिया बळकट करण्यासाठी वकील संरक्षण कायदा करणे आवश्‍यक आहे.

वकील संरक्षण कायद्यामुळे सर्वच वकील बांधवांना निर्भीडपणे न्यायालयीन प्रक्रिया राबविताना अडथळे येणार नाहीत. संपूर्ण महाराष्ट्रातील वकील बांधवांसाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांची प्रत्यक्ष भेट घेऊन वकील संरक्षण कायद्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी ॲड. अनुराधा येवले, ॲड. प्रज्ञा उजागरे, ॲड. गौरी सामलेटी, ॲड. करुणा शिंदे, ॲड. गीता, ॲड. धनलक्ष्मी, ॲड. स्विटी माळवदे, ॲड. अमित पाटील आदी उपस्थित होते. तसेच आपच्या वतीने वकील संरक्षण कायदा लागू करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांना देण्यात आले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *