लतिकाताई पवार यांनी स्विकारली प्रांत अध्यक्षपदाची जबाबदारी
अहमदनगर (प्रतिनिधी)- ऑल इंडिया लिनेस क्लब मल्टिपल चतुर्भुजा अंतर्गत एमएच 3 गोदातरंगच्या प्रांत पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा महिलांनी उभे केलेल्या सामाजिक कार्याचा जागर करुन उत्साहात पार पडला. या सोहळ्यात लतिकाताई पवार यांनी प्रांत अध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारली.
नागापूर येथील हॉटेल हिरा पॅलेस येथे ऋणानुबंध हा पदग्रहण सोहळा रंगला होता. पदग्रहण सोहळ्यासाठी ऑल इंडिया लिनेस क्लबच्या संस्थापिका अध्यक्षा डॉ. मंजिरी कुलकर्णी पदग्रहण अधिकारी म्हणून उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून चार्टर्ड बहुप्रांतीय अध्यक्षा डॉ. वर्षाताई झंवर, माजी बहुप्रांतीय अध्यक्षा अंजलीताई विसपुते, माजी प्रांत अध्यक्षा छायाताई राजपूत, सचिव अमल ससे, खजिनदार जया भोकरे, माजी प्रांताध्यक्षा सुनीला नरपनवार, रंजनीताई गोंदकर, प्रांत अध्यक्षा हेमा गिरधानी,
प्रारंभी ढोल ताशाच्या गजरात व औक्षण करुन पारंपरिक पद्धतीने पाहुण्यांचे स्वागत करुन त्यांचा पैठणी साडी, विविध आभुषणे व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करुन दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
डॉ. वर्षाताई झंवर म्हणाल्या की, ऑल इंडियाच्या 10 हजार महिला सभासदापर्यंत लतिकाताई यांचे सामाजिक कार्य जाणार आहे. महिलांनी उभे केलेले सामाजिक कार्य छोटे नसून, हे सामाजिक क्रांतीचे पाऊल आहे. सामाजिक कार्य करणाऱ्या महिला सेवाभावांच्या ऋणानुबंधनात जोडले गेले आहे. कुटुंबापुरते मर्यादित न राहता, संकुचित विचार सोडून महिलांनी मोठे समाजकार्य उभे केले आहे. तर शेवटच्या घटकांचा विचार करून सेवा कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविक नंदिनीताई गोखले यांनी केले. या कार्यक्रमात स्वानंदी हास्य क्लब व रणरागिणी भजनी मंडळाच्या महिला सदस्यांनी लिनेसचे सदस्यत्व स्वीकारले. या नवीन सदस्यांना अंजली विसपुते यांनी शपथ देवून, क्लबचा फ्लॅग प्रदान केला.
पदग्रहण सोहळ्यामध्ये डॉ. मंजिरी कुलकर्णी यांनी पदाधिकाऱ्यांना जबाबदारीची कर्तव्य समजावून सांगितले व त्यांना पदाची शपथ दिली. यावेळी कुलकर्णी म्हणाल्या की, सर्वात मोठा जिल्हा असलेला अहमदनगर सहकार क्षेत्राची जन्मभूमी आहे. सहकारातूनच मोठे सामाजिक कार्य उभे राहिले असून, महिलांनी स्वबळावर लिनेस क्लबची स्थापना केली आहे. लिनेसचे तिसरे वर्ष असून, देशातील सामाजिक कार्य करणाऱ्या महिला क्लबशी जोडले गेले असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रांत अध्यक्षपदाचा पदभार घेताना लतिकाताई पवार यांनी मिळालेली जबाबदारी ही सर्व महिला सदस्यांची असून, सर्वांनी केलेल्या सेवाकार्याचा बहुमान आहे. पदाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासह विविध सामाजिक उपक्रम राबवून दुर्बल घटकांना आधार देण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमास पुणे, संगमनेर, कोपरगाव, शिर्डी, नाशिक, श्रीरामपूर येथून आलेल्या सर्व सदस्यांनी नवीन पदाधिकाऱ्यांचे स्वागत करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते लिनेस क्लबच्या पॉवर ऑफ लव या पिनचे, तर ऋणानुबंध या लिनेस डिरेक्टरीचे विमोचन करण्यात आले. सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल कोपरगाव व संगमनेरच्या लिनेस क्लबच्या पदाधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजश्रीताई पिंगळे यांनी केले. आभार अमल ससे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रसाद पवार, प्रांजल पवार, जया भोकरे, नीलम परदेशी, शोभा भालसिंग, शर्मिला कदम, अजिता एडके, मीनाक्षी जाधव, छायाताई बंडगर, स्नेहल कौसल्ये, सविता जोशी, कोकीला शेळके, डॉ. सोनाली मोटे, डॉ. स्वामिनी बच्छाव, दिपाली कडू, मीरा शहापूरे, योगिनी अक्कडकर, शशिकला भालसिंग यांनी परिश्रम घेतले.