• Thu. Mar 13th, 2025

लायन्स व लिओ क्लबचा एक राखी सिमेवरील जवानांसाठी उपक्रम

ByMirror

Aug 1, 2024

जवानांसाठी राख्या पाठविण्याचे आवाहन

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील लायन्स आणि लिओ क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने एक राखी सिमेवरील जवानांसाठी हा उपक्रम राबविण्यात येत असून, या उपक्रमातंर्गत रक्षा बंधननिमित्त सिमेवरील जवानांसाठी शहरातून राख्या पाठविण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी शहरातील महिला व युवतींनी 2 ऑगस्ट पूर्वी मिस्किन मळा, गंगा उद्यान जवळील पारगावकर हॉस्पिटल येथे राख्या जमा करण्याचे आवाहन लायन्सच्या अध्यक्षा डॉ. अनघा पारगावकर, माजी अध्यक्षा तथा सचिव डॉ. सिमरन वधवा व लिओ क्लबच्या अध्यक्षा रिधिमा गुंदेचा यांनी केले आहे.


दरवर्षी डॉ. संगीता कुलकर्णी जवानांसाठी राख्या पाठवित असतात. त्यांच्या या उपक्रमाला हातभार लावण्यासाठी लायन्सच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात आला आहे. या वर्षी 19 ऑगस्ट रोजी राखी पौर्णिमा देशभर उत्साहात साजरी होणार आहे. बहीण आपल्या भावाला राखी बांधून भावाचे प्रेम आणि संरक्षण मिळवत असते, मात्र देशाच्या रक्षणासाठी आपल्या सर्वांच्या संरक्षणासाठी सीमेवर तैनात असलेल्या जवानांना या सणासाठी घरी येणे शक्य नसते.

त्यामुळे त्यांना देशातील प्रत्येक बहिणींच्या प्रेमाचे प्रतिक असलेल्या राख्या पाठविण्याचे कार्य केले जाणार आहे. या उपक्रमासाठी लायन्सच्या खजिनदार अंजली कुलकर्णी, लिओ क्लबच्या सचिव रुचिता कुमार, खजिनदार हर्षवर्धन बोरुडे परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *