गावागावातून कार्यकर्ते होणार अधिवेशनात सहभागी
रिपाई युवक आघाडीच्या बैठकीत शाखेद्वारे पक्ष बांधणी मोहिमेचा निर्धार
अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची शिर्डी-साकुरी येथे रविवारी (दि. 28 मे) होणार्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या रिपाई युवक आघाडीच्या बैठकीत अधिवेशनाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. यावेळी रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे, शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, ज्येष्ठ नेते संजय कांबळे, युवक जिल्हाध्यक्ष विवेक भिंगारदिवे, युवक जिल्हा कार्याध्यक्ष बंटी गायकवाड, शहर जिल्हाकार्याध्यक्ष योगेश त्रिभुवन, तालुकाध्यक्ष अविनाश भोसले, आकाश वैराळ, तालुका कार्याध्यक्ष कृपाल भिंगारदिवे, ग्रामपंचायत सदस्य हर्षल कांबळे, अक्षय भिंगारदिवे, संदेश पाटोळे, जयराम आंग्रे, राहुल देवरे, राजशे ठोंबरे, कुणाल भिंगारदिवे, करण भिंगारदिवे, लखन शेंडगे, सुरज भिंगारदिवे, जिवा कांबळे, ग्रामपंचायत सदस्य शैलेश भोसले आदींसह रिपाईचे पदाधिकारी व युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिवेशनाच्या समारोपानंतर जूनला मार्केटयार्ड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ रिपाईच्या शहरातील पहिल्या शाखेचे उद्घाटन करून पक्ष बांधणीच्या मोहिमेला सुरुवात करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तर शहराच्या विविध ठिकाणी व गावागावात आरपीआयच्या शाखा स्थापन करून पक्षाची ताकद वाढविण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

जिल्हाध्यक्ष सुनील साळवे म्हणाले की, शिर्डीला होणारे राज्यस्तरीय अधिवेशन करण्यासाठी जिल्ह्यातून संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्यातून कार्यकर्ते अधिवेशनाला जाणार असून, तालुक्याच्या पदाधिकारींवर विविध जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दक्षिणेतील रिपाईचे सर्व पदाधिकारी व हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते अधिवेशनासाठी सहभागी होणार आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घेऊन पक्षाचे राष्ट्रीय नेते तथा केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांनी पक्ष उभा केला आहे. त्यांना ताकद देण्यासाठी पक्षातील प्रत्येक कार्यकर्ता कटिबद्ध असून, त्यांच्या मागे उभे असल्याचे त्यांनी सांगितले.
युवक जिल्हाध्यक्ष विवेक भिंगारदिवे म्हणाले की, समाजातील युवा शक्ती निळ्या झेंड्याखाली रिपाईच्या माध्यमातून एकवटली आहे. अहमदनगर जिल्हा आंबेडकरी चळवळ व रिपाईचा बालेकिल्ला असून, रिपाईला बळकट करण्यासाठी युवा शक्ती एकवटली आहे. या दक्षिणेतून मोठ्या संख्येने युवक सहभागी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.