शंभर टक्के निकाल
अहमदनगर (प्रतिनिधी)- इकरा एज्युकेशन अॅण्ड वेलफेअर सोसायटी संचलित मुकुंदनगर येथील पी.ए. इनामदार स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजच्या इयत्ता बारावी एचएससी बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन केले. शाळेचा शंभर टक्के निकाल लागला आहे.
शाळेच्या गुणवत्ता यादीत प्रथम आलेली उम्मेहानी अजीज अहमद तांबोली (73 टक्के), द्वितीय- आरशीन आरिफ शेख (66.83 टक्के) व तृतीया- आसिया आसिफ शेख (66.33 टक्के) यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे चेअरमन अब्दुल रहिम खोकर, व्हाईस चेअरमन इंजि. इकबाल सय्यद, प्राचार्य हारुन खान, उपप्राचार्या फरहाना शेख, मुशीर आलम आदींसह मार्गदर्शक शिक्षक व पालक उपस्थित होते. संस्थेचे सचिव विकार काझी व खजिनदार डॉ. खालिद शेख यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.