जिल्हाध्यक्षपदी उमाशंकर यादव तर शहराध्यक्षपदी राजू शिंदे यांची निवड
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील शासकीय विश्रामगृह येथे बहुजन समाज पार्टीच्या पदाधिकार्यांच्या बैठकीत जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली. जिल्हाध्यक्षपदी उमाशंकर यादव तर शहराध्यक्षपदी मेजर राजू शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.
काही महिन्यांपूर्वी बहुजन समाज पार्टीची संपूर्ण कार्यकारणी बरखास्त करण्यात आली होती. नुकतीच बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक उत्तर प्रदेशचे खासदार तथा महाराष्ट्र प्रभारी डॉ. अशोक सिध्दांत व प्रदेशाध्यक्ष अॅड. संदीप ताजणे यांच्या आदेशानुसार घेण्यात आली. पश्चिम महाराष्ट्र झोन प्रभारी काळूराम चौधरी व प्रदेश कार्यकारणी सदस्य सुनिल ओव्हळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत नूतन कार्यकारणी निवडण्यात आली.
या कार्यकारणीत जिल्हा प्रभारीपदी शंकर भैलुमे, राजू खरात, बाळकृष्ण काकडे, अण्णासाहेब धाकतोडे, जिल्हा उपाध्यक्षपदी विकास चव्हाण, संतोष जाधव, जिल्हा महासचिवपदी जाकीर शहा, कोषाध्यक्षपदी अॅड. संकेत गायकवाड, बीव्हीएफपदी दत्तात्रय सोनवणे, बामसेफवर सुधाकर भोसले तसेच शहर उपाध्यक्षपदी पंकज लोखंडे, शहर महासचिव रवींद्रकुमार प्रसाद, कोषाध्यक्षपदी बाळासाहेब काते, सचिवपदी रामचंद्र पवार, बीव्हीएफपदी शंकर शेंडगे, नेवासा विधानसभा अध्यक्षपदी कमल सपकाळे यांची नियुक्ती करण्यात आली.
पश्चिम महाराष्ट्र झोन प्रभारी काळूराम चौधरी व प्रदेश कार्यकारणी सदस्य सुनिल ओव्हळ यांच्या हस्ते नुतन पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. काळूराम चौधरी यांनी पक्ष वाढीसाठी आणि पक्षाचे ध्येय-धोरण जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे पदाधिकार्यांना सूचना केल्या. सुनिल ओव्हळ यांनी प्रास्ताविकात पक्षाची पार्श्वभूमी सांगून ध्येय-धोरण स्पष्ट केले.
या बैठकीला सुनील मगर, मच्छिंद्र ढोकणे, संजय डहाणे, गणेश बागल, राहुल छत्तीसे, सलीम अत्तार, संदेश भाकरे, अनिकेत ढोकळे, विठ्ठल म्हस्के, महती कुमार, संजय संसारे, रवी भालेराव, बाबासाहेब कदम, संतोष मोरे, सिद्धार्थ पाटोळे, किशोर शिंदे, बाळासाहेब कांबळे आदी उपस्थित होते.