• Thu. Feb 6th, 2025

शहरात आरपीआयच्या संपर्क कार्यालयाचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आठवले यांच्या हस्ते उद्घाटन

ByMirror

Mar 17, 2022

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते झाले. जिल्ह्याच्या दौर्‍यावर आलेले ना. आठवले यांनी नुकतेच स्वास्तिक चौक येथील आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ कापसे, जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे, शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, नगरसेवक राहुल कांबळे, युवक जिल्हाध्यक्ष विवेक भिंगारदिवे, जेष्ठ नेते संजय कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष विजय भांबळ, जेष्ठ नेते विलास साठे, महिला जिल्हाध्यक्ष आरती बडेकर, नगर तालुकाध्यक्ष अविनाश भोसले, शहर जिल्हाउपाध्यक्ष योगेश त्रिभुवन, भिंगार शहराध्यक्ष आकाश तांबे, आदिवासी-पारधी आघाडी जिल्हाध्यक्ष शाम भोसले, कविता नेटके, युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रविण वाघमारे आदी उपस्थित होते.
ना. रामदास आठवले म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेने आरपीआयची वाटचाल सुरु आहे. सत्तेत वाटा घेऊन शेवटच्या घटकांना न्याय देण्याचे काम केले जात आहे. युवा वर्ग पक्षाशी जोडला जात असून, सर्वसामान्यांचे प्रश्‍न देखील आरपीआयच्या माध्यमातून सोडवले जात आहे. जिल्ह्यात पक्षाची ताकत वाढविण्यासाठी सर्व पदाधिकारी योगदान देत असल्याचे स्पष्ट करुन सुरु असलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.
जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांनी आरपीआयच्या माध्यमातून संपुर्ण जिल्ह्यात उत्तमपणे कार्य सुरु असून, सर्व समाज पक्षाशी जोडला जात आहे. दीन-दुबळ्या घटकांना आधार व पाठबळ देण्याचे कार्य आरपीआय करत आहे. वंचितांचे प्रश्‍न सोडविणे या प्रमुख उद्देशाने पक्षातील प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ता योगदान देत आहे. वंचित व दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबध्द राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी कर्जत तालुकाध्यक्ष संजय भैलुमे, पाथर्डी तालुकाध्यक्ष बाबा राजगुरु, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता कदम, युवक जिल्हा उपाध्यक्ष विशाल काकडे, शेवगाव तालुका अध्यक्ष विजय बोरुडे, जामखेड तालुका कार्याध्यक्ष सतिश (नाना) साळवे, युवराज गायकवाड, बापू जावळे, शिर्डी युवा नेते गणेश साळवे, पारनेर तालुका उपाध्यक्ष गोरख सुर्यवंशी, पाथर्डी तालुका कार्याध्यक्ष नाना पगारे, कर्जत युवक तालुकाध्यक्ष भिमराव साळवे, प्रा. चंद्रकांत सरोदे, युवक शहराध्यक्ष सागर कांबळे, कृपाल भिंगारदिवे, ग्रा.पं.सदस्य शैलेश भोसले, विवेक थोरात, अविनाश उमाप, यशराज शिंदे, सुरज भिंगारदिवे, प्रतिक नरवडे, वैभव बनसोडे, करण भिंगारदिवे, बंटी गायकवाड, बाळासाहेब नेटके, विशाल कदम, अमोल सोनवणे, किरण रंदवे, छबुनाना गायकवाड, विनोद जावळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *