बाबासाहेबांनी समतेवर आधारित नवसमाजाचे स्वप्न साकारले -संजय सपकाळ
अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. छावणी परिषदेच्या हॉस्पिटलमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, अभिजीत सपकाळ, कॅन्टोमेंट बोर्डाचे उपाध्यक्ष संभाजीराव भिंगारदिवे, रमेश वराडे, दिपक बडदे, सिद्धार्थ आढाव, शिवम भंडारी, योगेश करांडे, सर्वेश सपकाळ, अशोक पराते, संतोष हजारे, सागर चाबुकस्वार, संतोष धीवर, रमेश भिंगारदिवे, किशोर भिंगारदिवे, जनाभाऊ भिंगारदिवे, सदाशिव मांढरे, सौरभ रासने, वसंत राठोड, अक्षय भांड, डॉ. गीतांजली पवार, शितल भुजबळ, सुनिता कदम आदी उपस्थित होते.
संजय सपकाळ म्हणाले की, आंबेडकरांनी दीन-दलितांच्या उध्दारासाठी कार्य केले. गुलामगिरीत चाचपडलेल्या समाजाला न्याय, हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी संघर्ष केला. समतेवर आधारित नवसमाजाचे स्वप्न त्यांनी साकारले. अस्पृश्यता आणि जातीव्यवस्थेच्या अंधारात प्रकाशवाट निर्माण करुन त्यांनी न्याय प्रस्थापित केले. तर संविधानाच्या माध्यमातून त्यांनी देशात स्वातंत्र्य, समता व बंधुता प्रस्थापित केल्याचे त्यांनी सांगितले.
