• Thu. Mar 13th, 2025

चोरीला गेलेले रेणुकाई माळ देवस्थान मिळवून द्यावे

ByMirror

Apr 3, 2023

भाजप अनुसुचित जाती मोर्चा महिला आघाडीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण

एमआयडीसीच्या प्रकल्पात देवस्थान गेल्याचा आरोप

अहमदनगर (प्रतिनिधी)- आजोबांच्या मालकी हक्क असलेली नागापूर, एमआयडीसी येथील रेणुकाई माळ देवस्थान चोरीला गेल्याची तक्रार करत त्यांचे नातू असलेले अंतोन गायकवाड यांनी सदर देवस्थान परत मिळवून देण्याच्या मागणीसाठी सोमवारी (दि.3 एप्रिल) जिल्हाधिकारी कार्यालया समोर भाजप अनुसुचित जाती मोर्चा महिला आघाडीच्या वतीने कुटुंबीयांसह उपोषण केले. या उपोषणात शारदा अंतोन गायकवाड, आदिका गायकवाड, आरती गायकवाड, प्रिती गायकवाड, प्रतिक गायकवाड, धनराज गायकवाड, अर्जुन गायकवाड आदी सहभागी झाले होते.


नागापूर, एमआयडीसी येथील सर्व्हे नंबर 29/1 ही जमीन आजोबा बाबू रामा, दगडू केसू गायकवाड व माझे नातेवाईक लक्ष्मण ठकू चांदणे यांच्या नावे होती. त्या जमीनीमध्ये ते शेती करुन कुटुंबाचा उदारनिर्वाह करत होते. या जमिनीमध्ये रेणुकाईचा माळ देवीचे देवस्थान होते. त्या ठिकाणी मोठे वडाचे झाड आमच्या पंजोबा केसू गायकवाड यांनी लावले होते. देवीची मनोभावी सेवा आजोबा, नातेवाईक, आई वडील व इतर नातेवाईक करीत होते. दरवर्षी नवरात्र उत्सव साजरा करीत होते. नाशिक येथून रेणुकाईची पालखी आणून व यात्रा उत्सव चांगल्या पध्दतीने साजरा करत असे.


मात्र 21 मे 1971 रोजी अहमदनगर औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र शासन यांनी ही जमीन अधिग्रहण केली. पण माझे आजी आजोबा, नातेवाईक यांनी रेणुकाईचा माळ देवी देवस्थान विकले नव्हते. त्यामुळे आम्ही दरवर्षीप्रमाणे नाशिक येथून पालखी आणून नवरात्र उत्सव साजरा करीत होतो. ती जमीन एका कंपनीने एम.आय.डी.सी. कडून विकत घेतली. अशाप्रकारे रेणुकाईचा देवी देवस्थान चोरीला गेले असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.


कुटुंबीय मागासवर्गीय व अशिक्षित असल्याने कुठल्याही प्रकारची तक्रार केली नाही. सध्या त्या जागेत एक कंपनी चालत असल्याचे स्पष्ट करुन, रेणुकाई माळ देवस्थान चोरीला गेल्याची तक्रार करत, सदर देवस्थानची मौजे नवनागापूर ग्रामपंचायतला नोंद व्हावी व देवस्थान मुळ वंशजांना परत मिळवून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *