• Sat. Sep 20th, 2025

प्रयोगशील शेतकरी सोमेश्‍वर लवांडे यांना फार्मर्स इनोव्हेशन अवॉडर्स जाहीर

ByMirror

Feb 28, 2023

भारतीय कृषी अनुसंधान संस्थान नवी दिल्लीच्या वतीने होणार राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

देशी-विदेशी चारा पिकावर केलेल्या संशोधन कार्याची दखल

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील प्रयोगशील शेतकरी सोमेश्‍वर लवांडे यांना भारतीय कृषी अनुसंधान संस्थान नवी दिल्लीचा फार्मर्स इनोव्हेशन अवॉडर्स हा राष्ट्रीय पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. 2 ते 4 मार्च या कालावधीत नवी दिल्ली येथे होणार्‍या पुसा कृषी विज्ञान मेळाव्यात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते लवांडे यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. 1 लाख रुपये, मानचिन्ह व प्रमाणपत्र या पुरस्काराचे स्वरुप आहे.


सोमेश्‍वर लवांडे हे फत्तेपूर (ता. नेवासा) सारख्या छोट्याश्या गावात शेतीचे वेगवेगळे प्रयोग केले आहे. त्यांनी इंडोनेशिया, थायलंड, ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश या परदेशी जातीच्या चार वाणांची तसेच स्वदेशी सात नेपियर जातीच्या चार्‍याची लागवड करत संशोधन केले आहे. कमी वेळेत अधिक उत्पादन देणारे पिके आणि दूधासाठी सकस असलेला चारा पिकांचे त्यांचे प्रयोग शेतकर्‍यांच्या पसंतीस उतरली आहे.

देशभरातून शेतकरी वर्ग त्यांची शेती पहाण्यासाठी भेटी देत असतात, तर कृषी क्षेत्रातील विविध शास्त्रज्ञांनी त्यांच्या शेती प्रयोगाला भेट देऊन त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. देशी-विदेशी चारा पिकावर त्यांनी केलेल्या संशोधन कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *