अहमदनगर (प्रतिनिधी)- नुकतेच झालेल्या राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत शहरातील पाच विद्यार्थी चमकले. ऑनलाईन पध्दतीने ही राष्ट्रीय अबॅकस स्पर्धा पार पडली. यामध्ये देशातील अनेक राज्यातून विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता.
शहरातील ग्रेड प्लस क्लासचे पाचही विद्यार्थी राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत चमकले आहे. यामध्ये सचिन पाटील, पार्थ बंब, अथर्व लोटके यांनी द्वितीय, स्वराज्य लोटके याने तृतीय तर अर्णव लोटके याने चतुर्थ क्रमांकाचा बहुमान पटकाविला आहे. गुणवंत विद्यार्थ्यांनी तीन मिनिटांमध्ये पेपर सोडविला होता. गुणवंत विद्यार्थ्यांना प्रतीक शेकटकर, शाईन शेख, मंजुषा फल्ले यांचे मार्गदर्शन लाभले.