• Fri. Jan 30th, 2026

सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या कौशल्यक्षम प्रशिक्षणाला प्रतिसाद

ByMirror

Feb 14, 2023

विविध मोफत व्यावसायिक प्रशिक्षणासाठी युवक-युवतींची नोंदणी

बेरोजगारीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी कौशल्यक्षम प्रशिक्षण काळाची गरज -शिवाजी पालवे

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील माजी सैनिकांचे जय हिंद फाऊंडेशन, प्रथम कौशल्य प्रशिक्षण केंद्र व कोल्हार ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना कौशल्यक्षम प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने मोफत कौशल्य विकास शिबिर राबविण्यात आले. कोल्हार (ता. पाथर्डी) येथे राबविण्यात आलेल्या या शिबिरात पंचक्रोशीतील युवकांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवला.


मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या संकल्पनेतून कौशल्य प्रशिक्षणाचा हा उपक्रम गाव पातळीवर राबविण्यात आला. या शिबिराच्या माध्यमातून युवक-युवतींना हेल्थकेअर, सीएनसी, हाउसकीपिंग, इलेक्ट्रिकल्स, प्लंबर, फायर सर्व्हिस, वेल्डिंग वर्क्स, ऑटो सर्व्हिस, मोटर सायकल फिटर आदी व्यावसायिक प्रशिक्षिण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी युवकांची मोठ्या प्रमाणात नाव नोंदणी करण्यात आली.


या प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी प्रथम एज्युकेशनचे दिपक बांगर, नंदू पालवे, ग्रामपंचायत सरपंच राजू नेटके, उपसरपंच गोरक्ष पालवे, ग्रामपंचायत सदस्य ईश्‍वर पालवे, सोपान पालवे, संदीप पालवे, माजी मुख्याध्यापक महादेव पालवे गुरुजी, माजी सरपंच बाबाजी पालवे, जय भगवान महासंघाचे मदन पालवे, युवा नेते बाळासाहेब पालवे, सोपानराव पालवे, माजी मुख्याध्यापक नामदेव जावळे, प्रा. प्रेमकुमार पालवे, किशोर पालवे, निवृत्त पोलीस अधिकारी शंकरराव पालवे, दिनकर पालवे, जय हिंद फाउंडेशनचे शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, भाऊसाहेब पालवे, अशोक गर्जे, साहेबराव पालवे, अ‍ॅड. पोपटराव पालवे, गौरव गर्जे, हौसराव पालवे, उद्धव गिते, मेजर अशोक जावळे, आजिनाथ पालवे, गणेश पालवे, बाजीराव गीते, चंदू नेटके, महादेव पालवे, राजू पालवे, विकी पालवे, माजी सरपंच कौसाबाई पालवे, आरोग्य विभागाच्या सुनिता गर्जे, चंद्रकला नेटके, लक्ष्मीबाई नेटके आदींसह गावातील युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


शिवाजी पालवे म्हणाले की, सुशिक्षित युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी कौशल्यक्षम प्रशिक्षण काळाची गरज बनली आहे. शिक्षणाला व्यावसायिक प्रशिक्षणाची जोड मिळण्याची गरज आहे. माध्यमिक शाळेतच विद्यार्थ्यांच्या कला-गुणांनूसार व्यावसायिक प्रशिक्षण दिले गेल्यास भविष्यात रोजगाराचा प्रश्‍न देखील सुटण्यास मदत होणार आहे. युवकांनी देखील नोकरीच्या मागे न पळता स्वत:चा व्यवसाय उभे करण्याचे त्यांनी आवाहन केले. गावातील युवक-युवतींच्या रोजगारासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल सरपंच राजू नेटके यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *