आरोग्याचा प्रश्न जिव्हाळ्याचा असून, ओपन जिममुळे आरोग्य सदृढ राहण्यास मदत होणार -रोहिणीताई शेंडगे
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील नगर-कल्याण रोड येथील गणेशनगर मध्ये ओपन स्पेसवर विकसित करण्यात आलेल्या ओपन जिमचे लोकार्पण महापौर रोहिणीताई शेंडगे यांच्या हस्ते झाले. यावेळी नगरसेवक सचिन शिंदे, श्याम नळकांडे, अनिल बोरुडे, सुबोध कुलकर्णी, उमेश गोरे, महेश रसाळ, गनेश मंचिकटला, सुधीर जगताप, नाना देवतरसे, राजू वाळके, राजू तेलला, संतोष लयचेट्टी, पोपट रासकर, पोपट शेळके, सतिश भांबरकर, संजय वाघस्कर, किसन जंगम, बालाजी कोकणे, गौरव नेवसे, ताराबाई शिंदे, स्वाती रासकर, ज्ञानेश्वरी शर्मा, विजया जंगम, भापकर ताई, जयश्री देवतरसे, विमल जगताप, शिला गायकवाड, रूपेश लोखंडे, विशाल माने, अॅड. सतीश गिते, मनोज शिंदे, जय डीडवानिया, आविनाश पांढरे, शेखर उंडे, आघाव गुरुजी, ढगे मेजर, राहुल चौरे, सविता शिंदे, साक्षी शिंदे आदी उपस्थित होते.
या भागातील नागरिकांच्या सदृढ आरोग्याच्या दृष्टीकोनाने स्थानिक महिला व ज्येष्ठ नागरिकांना व्यायाम करता यावा, या उद्देशाने महापौर रोहिणीताई शेंडगे यांच्या सहकार्याने व नगरसेवक सचिन शिंदे यांच्या पाठपुराव्याने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून ही जिम विकसीत करण्यात आली आहे.

महापौर रोहिणीताई शेंडगे म्हणाल्या की, नगर-कल्याण रोड येथील भागात विविध विकास कामे मार्गी लावण्यात आले आहेत. इतर प्रलंबीत कामे मार्गी लावण्यासाठी या भागासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. आरोग्याचा प्रश्न जिव्हाळ्याचा असून, ओपन जिममुळे आरोग्य सदृढ राहण्यास मदत होणार आहे. तर या भागातील पाण्याचा प्रश्न गंभीर असून, ते देखील सोडविण्याचे नियोजन सुरू आहे. अमृत पाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून, त्याद्वारे हे प्रश्न सुटणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नगरसेवक सचिन शिंदे यांनी ओपन जिममुळे नागरिकांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होणार आहे. शारीरिक स्वास्थ्यासाठी व्यायाम महत्त्वाचा असून, या भागातील ज्येष्ठ नागरिक व महिलांना घराजवळ व्यायामाच्या सुविधा निर्माण करुन देण्यात आल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.