वै. ह.भ.प. लक्ष्मीबाई डोके यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार
अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक व धार्मिक कार्यात स्व. बलभीमराव (अण्णा) डोके व बापूसाहेब डोके आणि डोके कुटुंबीयांचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. रामराव ढोक महाराज यांनी केले.
स्व. बलभीमराव डोके व बापूसाहेब डोके यांच्या मातोश्री वै. ह.भ.प. लक्ष्मीबाई शांताराम डोके यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त अहमदनगर येथे रामराव ढोक महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी वै. ह.भ.प. लक्ष्मीबाई शांताराम डोके यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने त्यांच्या प्रतिमेची पूजा ढोक महाराज यांच्या हस्ते करण्यात आली.
पुढे बोलताना ढोक महाराज म्हणाले की, बापूसाहेब आणि स्व. अण्णासाहेब हे दोघे समाजात राम लक्ष्मणासारखी राहिले.त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत अहमदनगर येथे व्यवसायात पदार्पण करून यशस्वी झाले. व्यवसाय करताना डोके कुटुंबीयाने माणसे जोडण्याचे काम केले. डोके परिवाराला त्यांच्या वडिलांपासून वारकरी सांप्रदायाचा वारसा मिळाला आहे. माता लक्ष्मीबाई डोके यांनी बालपणापासूनच मुलांवर चांगले संस्कार केले. त्यांच्या संस्कारामुळे दोन मुले व नातू अॅड. शिवजीत डोके, अॅड. प्रसाद डोके व महेश डोके जीवनात यशस्वी झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार संग्राम जगताप, भाजपचे नेते भीमराव धोंडे, माजी आमदार नाना दरेकर, ह.भ.प. आंधळे महाराज, दादाभाऊ कळमकर व इतरांनी श्रद्धांजलीवर भाषणे केली. कार्यक्रमास आष्टी तालुक्यासह अहमदनगर शहरातील डोके परिवाराचे नातेवाईक व स्नेही तसेच सामाजिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.