अहमदनगर (प्रतिनिधी)- कर्जुनेखारे (ता. नगर) येथील ज्येष्ठ शेतकरी केरु यमाजी पळसकर यांचे नुकतेच वयाच्या 105 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. ते अत्यंत मनमिळावू व धार्मिक स्वभावाचे असल्याने, सर्वांना सुपरिचित होते. त्यांच्या पश्चात चार मुले, तीन मुली, पुतणे, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी गावात शोकाकुळ वातावरणात झाला. त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.