• Fri. Jan 30th, 2026

ऑर्किड प्री स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

ByMirror

Jan 24, 2023

विद्यार्थ्यांचे बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण

लहान वयातच मुलांच्या भवितव्याचा पाया रचला जातो -शिवाजी कर्डिले

अहमदनगर (प्रतिनिधी)- आलमगीर येथील स्पर्श सेवाभावी संस्था संचलित ऑर्किड प्री स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. रंगीबेरंगी पोशाख परिधान केलेल्या चिमुकल्यांनी नाटिका, नृत्य अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमास उपस्थित पालकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.


माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी महेश झोडगे, पंचायत समितीचे सदस्य राहुल पानसरे, संतोष यादव, माजी नगरसेवक नितीन शेलार, राजताई कवडे, समाज कल्याण शिक्षण विभागाचे रमजान तांबोळी, श्रीराम शिंदे, अपर्णा मचे, प्रिया वाकचौरे, संस्थेचे संस्थापक सचिव प्रविण साळवे, अध्यक्षा शितल साळवे, खजिनदार अमोल आल्हाट आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


आमदार शिवाजी कर्डिले म्हणाले की, लहान वयातच मुलांच्या भवितव्याचा पाया रचला जातो. पुस्तकी ज्ञानाबरोबर विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव मिळण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम उपयुक्त ठरतात. विद्यार्थ्यांमध्ये विविध कला-गुण दडलेल्या असतात. काही अभ्यासात हुशार नसले, तरी इतर क्षेत्रात आपली उत्तम कामगिरी करुन दाखवितात. हे कला, गुण ओळखून त्यांना प्रोत्साहन देण्याचे त्यांनी सांगितले. तर विद्यार्थ्यांना अद्यावत शिक्षण देण्यासाठी पुढे आलेल्या ऑर्किड प्री स्कूलला जागेसह सुसज्ज इमारत उपलब्ध करुन देण्याचे त्यांनी आश्‍वासन दिले.


प्रास्ताविकात संस्थापक सचिव प्रविण साळवे म्हणाले की, सर्वसामान्य घटकातील विद्यार्थ्यांना अद्यावत इंग्रजीचे शिक्षण देण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. प्री स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पाया पक्का झाल्यास ते झपाट्याने प्रगती करतात. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर कला, गुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाहुण्यांचे स्वागत स्वागत अमोल आल्हाट व शितल साळवे यांनी केले.


लहान लहान मुलांनी सादर केलेल्या बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थित नागरिक व पालक वर्ग मंत्रमुग्ध झाले. शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये राबविण्यात आलेल्या विविध कला, क्रीडा व शैक्षणिक स्पर्धांचे बक्षीस वितरण उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षिका अमरिन सय्यद, शुभांगी अमोलिक, सुजाता अंगारखे, शिक्षकेतर कर्मचारी सुनीता बोर्डे, सुशीला अहिरे, पालक शिक्षक संघाचे सदस्य मोहसीन याकुब पठाण, गजेंद्र सांगळे, कल्पना आरवडे, रुपाली शेलार, अनिसा शेख, रेश्मा सुतार आदींसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमरीन सय्यद व शुभांगी अमोलिक यांनी केले. आभार सुजाता अंगारखे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *