• Fri. Jan 30th, 2026

पाईपलाईन रोड येथील साक्षी पेरणे आर्टिस्ट्री आणि इन्स्टिट्यूटचे उद्घाटन

ByMirror

Jan 6, 2023

पार्लरच्या व्यावसायिक प्रशिक्षणातून युवतींना रोजगाराच्या संधी -आ. संग्राम जगताप

अहमदनगर (प्रतिनिधी)- ग्लॅमर लुकसाठी युवक-युवतींमध्ये मोठी क्रेझ निर्माण झाली आहे. बदलत्या काळानुरुप सलून व पार्लर व्यावसायिकांनी अद्यावत ज्ञानामध्ये प्रगती साधली असून, या व्यवसायाच्या माध्यमातून अनेक युवतींना रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. बेरोजगारीवर मात करण्यासाठी व्यवसायाभिमुख शिक्षणाकडे वळण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. शहरात मेकपचे अद्यावत इन्स्टिट्यूट उभे राहिल्याने युवतींना मोठ्या शहरात जाण्याची गरज भासत नसल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.


सावेडी, पाईपलाईन रोड येथील साक्षी पेरणे आर्टिस्ट्री आणि इन्स्टिट्यूटचे (मेकअप, स्किन, हेअर आणि स्पा) उद्घाटन आमदार जगताप व नगरसेविका शितलताई जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार जगताप बोलत होते. यावेळी आरपीआयचे महिला राष्ट्रीय उपाध्यक्षा प्रवीणताई घैसास, आरपीआयचे महिला जिल्हाध्यक्षा जयाताई गायकवाड, आरपीआयचे युवक प्रदेश अध्यक्ष अनिरुध्द घैसास, किरणताई बारस्कर, महिला उद्योजिका दर्शना गुगळे, उद्योजक रसीकलाल गुगळे, राजेश गुगळे, इन्स्टिट्यूटच्या संचालिका साक्षी पेरणे, कल्पना पेरणे, रवींद्र जाधव आदी उपस्थित होते.


साक्षी पेरणे म्हणाल्या की, फॅशन व ग्लॅमरच्या क्षेत्रासंबंधी अद्यावत ज्ञान असणे आवश्यक आहे. पार्लरचे अद्यावत चांगले ज्ञान व्यवसायाला उंच शिखरावर घेऊन जाणार आहे. तर या ज्ञानानेच समाजात सन्मान मिळणार आहे. अनेक उच्च शिक्षित झालेल्या युवतींना रोजगार नाही.

मात्र या असंख्य युवतींना पार्लरमुळे रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. युवतींना पायावर उभे करण्याच्या उद्देशाने इन्स्टिट्यूट चालविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रवीणताई घैसास यांनी व्यावसायिक प्रशिक्षण घेऊन आत्मनिर्भर होणे काळाची गरज बनली आहे. पार्लरच्या माध्यमातून अनेक महिला स्वयंपूर्ण झाल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *