दीन-दलितांना न्याय, हक्क मिळवून देऊन, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार बाबासाहेबांनी दिला -सुनील साळवे
अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्केटयार्ड चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, नगरसेवक राहुल कांबळे, रिपाईचे नेते संजय कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष विजय भांबळ, युवक जिल्हाध्यक्ष विवेक भिंगारदिवे, तालुकाध्यक्ष अविनाश भोसले, विलास साठे, महिला अध्यक्षा कविताताई नेटके, दीपक गायकवाड, पाथर्डी तालुकाध्यक्ष बाबासाहेब राजगुरू, नानासाहेब तूपेटे, जयराम आंग्रे, अविनाश कांबळे, रावसाहेब रंधवे, मच्छिंद्र गांगर्डे, बापू जावळे, कृपाल भिंगारदिवे, दत्तात्रय जावळे, बाळासाहेब नेटके, सिद्धार्थ कांबळे, योगेश त्रिभुवन, लहू घंगाळे, सिद्धांत दाभाडे, प्रदीप पवार, दीपक पाडळे आदी उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष सुनील साळवे म्हणाले की, दीन-दलितांना न्याय, हक्क मिळवून देऊन, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त करून देण्यासाठी बाबासाहेबांनी आपले जीवन वाहिले. अस्पृश्य समाजाला सार्वजनिक ठिकाणी पाणी पिण्यास मिळावे म्हणून महाड येथे चवदार तळे सत्याग्रह केला. सामाजिक समता प्रस्थापित करुन त्यांनी अस्पृश्यांना जगण्याचा अधिकार मिळवून दिला. अन्यायी जातीय व्यवस्था हद्दपार करण्यासाठी या महामानवाने शेवटचा श्वासापर्यंत संघर्ष केला त्यांनी सांगितले.
