पाच दिवस शहरात रंगला होता व्हॉलीबॉलचा थरार
अहमदनगर (प्रतिनिधी)- अनंत बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सरकार चषक 2022 व्हॉलीबॉल स्पर्धेचा अंतिम सामना सहकार क्लब व सरकार क्लब यांच्यात मुकुंदनगर येथील अलआलमिन मैदानावर रंगला होता. अत्यंत अटातटीच्या अंतिम सामन्यात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन सहकार क्लबने विजय संपादन करुन सरकार चषक पटकाविला.
शहरातील पंचपीर चावडी येथील सहकार क्रीडा मंडळ येथे मागील काही दिवसापासून सरकार चषक 2022 व्हॉलीबॉल स्पर्धेचे सामने सुरु होते. अंतिम सामना मुकुंदनगर येथील मैदानात खेळविण्यात आला. यामध्ये सहकार क्लबने पहिल्या व दुसर्या फेरीत 15-15 गुण मिळवले तर सरकार क्लबला पहिल्या फेरीत 12 व दुसर्या फेरीत 9 गुणावर समाधान मानावे लागले. या सामन्यात सहकार क्लबने 9 गुणांनी विजय मिळवला. हा सामना रात्री उशीरा पर्यंत रंगला होता. तर सामना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
विजयी संघ सहकार क्लबला प्रथम पारितोषिक कासम भाई केबलवाले यांच्यातर्फे रोख 11 हजार 111 रुपये व चषक देण्यात आले. द्वितीय पारितोषिक सरकार क्लबला शादाब खान यांच्यातर्फे 8 हजार 888 रुपये व चषक, तृतीय पारितोषिक वसीम शेख यांच्यातर्फे 5 हजार 555 रुपये, चषक, चतुर्थ पारितोषिक योगेश ठुबे यांच्यातर्फे 3 हजार 333 रुपये व चषक देण्यात आले. तसेच स्पर्धेसाठी विजेत्या संघास चषक हे फिजान शेख यांच्यावतीने देण्यात आले. या पारितोषिक वितरण कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक फैय्याज केबलवाला, इकबाल शेख, कासम केबलवाले, शादाब खान, वसीम शेख, योगेश ठुबे, अभिजित खोसे, इम्रान सय्यद, मेजर युसुफ सय्यद, अरबाज बागवान, समीर पठाण, असलम पटेल, फैजान खान, अक्रम शेख, मोसिन शेख, नोमान सय्यद, आकील सय्यद, आवेज शेख, फुरकान ब्राझील, फरहान शेख, राजेंद्र सुद्रिक, आनंद सत्रे, अभिजीत खरपुडे, अब्दुल अजीज, उमेश शेख, मन्सूर सय्यद, आदीसह अनंत बहुउद्देशीय सेवा संस्थेचे पदाधिकारी तसेच खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाच दिवस रंगलेल्या या व्हॉलीबॉल स्पर्धेत 16 संघांनी सहभाग नोंदवला होता.