• Sat. Nov 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

मढी येथे रविवारी जिल्हास्तरीय क्रॉस कंट्री अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन

ByMirror

Nov 21, 2026
खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन

राज्य स्पर्धेसाठी जिल्हा संघाची होणार निवड


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन, अहिल्यानगर आणि शिवछत्रपती करिअर अकॅडमी पाथर्डी (भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय क्रॉस कंट्री अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार, दिनांक 6 डिसेंबर 2026 रोजी सकाळी 8:30 वाजता श्री क्षेत्र मढी येथे (मढी-पाथर्डी रोड) पार पडणार आहे. या स्पर्धेतून आगामी राज्य क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी अहिल्यानगर जिल्ह्याचा संघ निवडण्यात येणार आहे.
पुढील राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धा दिनांक 25 व 26 डिसेंबर 2026 रोजी उमरगा (जि. धाराशिव) येथे होणार आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेतील प्रत्येक गटातील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना गुणवत्ता प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरविण्यात येणार आहे. ही स्पर्धा केवळ अहिल्यानगर जिल्ह्यातील खेळाडूंसाठीच मर्यादित असून 14 वर्षांखालील खेळाडूंना यात सहभागी होता येणार नाही. खेळाडूंची नाव नोंदणी स्पर्धेच्या ठिकाणी सकाळी 8:00 वाजता केली जाणार आहे.


सर्व खेळाडूंनी आपला मूळ (ओरिजनल) जन्म दाखला व आधार कार्ड सोबत आणणे बंधनकारक आहे. तसेच, राज्य स्पर्धेत खेळण्यासाठी प्रत्येक खेळाडूने आपला ‘AFI UID नंबर’ काढणे आवश्‍यक आहे. स्पर्धेसंदर्भात काही तक्रार असल्यास इव्हेंट संपल्यानंतर एक तासाच्या आत योग्य त्या पुराव्यासह स्पर्धा आयोजकांकडे अर्ज करावा, त्यावर आयोजन समिती अंतिम निर्णय देईल.


जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन अहिल्यानगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष सुनील जाधव व उपाध्यक्ष राजेंद्र कोतकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी दिनेश भालेराव, रमेश वाघमारे (9271233662), राहुल काळे (9975320837), श्रीरामसेतु आवारी (9322015046), किशोर मरकड (9657189924) किंवा जगन गवांदे (9881328186) यांच्याशी संपर्क साधावा.


—–
स्पर्धेचे गट व अंतर खालीलप्रमाणे :
पुरुष व मुले: खुला गट 10 कि.मी., 20 वर्षांखालील मुले 8 कि.मी., 18 वर्षांखालील मुले 6 कि.मी., 16 वर्षांखालील मुले 2 कि.मी.
महिला व मुली: खुला गट 10 कि.मी., 20 वर्षांखालील मुली 6 कि.मी., 18 वर्षांखालील मुली 4 कि.मी., 16 वर्षांखालील मुली 2 कि.मी.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *