आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने सुभाष वाघमारे यांनी केला सत्कार
मातंग समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार तथा युवा नेते अमित गोरखे यांचे अहिल्यानगर शहरात आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी सुभाष वाघमारे यांनी आमदार गोरखे यांचा सत्कार करून त्यांचे स्वागत केले. या भेटीदरम्यान मातंग समाजाच्या विविध सामाजिक, शैक्षणिक आणि विकासात्मक प्रश्नांवर त्यांच्याशी चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते पंडित सर, वाघमारे, केतकी ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रकाश घोरपडे, युवा उद्योजक प्रदीप वावरे, ज्येष्ठ नेते सुनील उमाप आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुभाष वाघमारे म्हणाले की, भारतीय जनता पक्षातील युवा नेतृत्व म्हणून आमदार अमित गोरखे यांच्याकडे आशेने पाहिले जाते. त्यांनी सामाजिक, राजकीय आणि संघटनात्मक क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वातून स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन विकासाची वाटचाल करण्याची त्यांची भूमिका निश्चितच प्रेरणादायी आहे. युवकांचे प्रश्न, सामाजिक समरसता आणि वंचित घटकांच्या विकासासाठी त्यांचे नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, या भेटीत मातंग समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. समाजातील शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी शहरात आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून प्रश्न सुटत आहे. मात्र आवश्यक असलेल्या उपाययोजना, समाजबांधवांना भेडसावणाऱ्या समस्या तसेच विविध मागण्यांकडे आमदार अमित गोरखे यांचे लक्ष वेधण्यात आले.

