• Sun. Oct 11th, 2026

Mirrornews24

Marathi News

नवरात्र उत्सवानिमित्त शहरात 15 ऑक्टोबरला दांडिया नाईटचे आयोजन

ByMirror

Oct 10, 2026
रंगणार दांडिया व डान्स स्पर्धा

जिव्हाळा ग्रुप आयोजित व महावीर ग्रुप प्रायोजित उपक्रम


रंगणार दांडिया व डान्स स्पर्धा


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त शहरातील जिव्हाळा ग्रुप आयोजित व महावीर ग्रुप प्रायोजित दांडिया नाईटचे गुरुवारी (दि.15 ऑक्टोबर) संध्याकाळी टिळकरोड येथील नंदनवन लॉन येथे आयोजन करण्यात आले आहे. या दांडिया नाईटमध्ये सहभागी होण्याचे आवाहन जिव्हाळा ग्रुपच्या अध्यक्षा अल्पना कासवा व सविता काळे यांनी केले आहे.
महिलांनी एकत्र येऊन जिव्हाळा ग्रुपची मुहुर्तमेढ रोवली असून, या ग्रुपच्या माध्यमातून विविध सामाजिक व धार्मिक उपक्रम राबविण्यात येत आहे. तर विविध सण-उत्सवात महिलांना एक व्यासपीठ निर्माण करुन देण्यासाठी ग्रुपचे कार्य सुरु आहे. या ग्रुपमध्ये जिल्ह्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिला जोडल्या गेल्या आहेत. या दांडिया नाईटच्या कार्यक्रमात नवरात्रीनिमित्त विविध स्पर्धा रंगणार असल्याची माहिती अल्पना कासवा यांनी दिली.


यामध्ये बेस्ट सोलो डान्सर, बेस्ट कपल डान्स, बेस्ट ड्रेसअप, बेस्ट ग्रुप डान्स, बेस्ट किड्स डान्सरचे आकर्षक बक्षिस देण्यात येणार आहे. तर मिस व मिस्टर जिव्हाळा हे विशेष पुरस्कार यावर्षी ठेवण्यात आले आहे. या दांडिया नाईटचे वैशिष्टये म्हणजे नॉन स्टॉप म्युझिक लाईट, डीजे, एलईडी वॉल स्टेज आणि फूड काउंटर्स राहणार आहे. तसेच भाग्यवान विजेत्यांना कुपनच्या लकी ड्रॉ द्वारे बक्षिसे, महिलांना पैठणी साडीसह सोने व चांदीचे बक्षीस दिले जाणार आहे.


या कार्यक्रमासाठी बजरंग काशीनाथ गुरव, सरस्वती हॉस्पिटल, नॉव ॲण्ड फॉरेव्हर फोटोग्रॉफी ॲण्ड फिल्म, उडाण डिजायनिंग लाईफ यांचे विशेष सहकार्य लाभले असून, ॲपराईज ट्योटोरील्स, ट्रेक कॅम्प आणि सुख योगा असोसिएट्स पार्टनर आहेत.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *