शेतकरी हिताला प्राधान्य देण्याचा निर्धार
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर तालुका मतदारसंघातील महिला राखीव प्रवर्गातून सुवर्णा लहामगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड. आनंद लहामगे उपस्थित होते.
यावेळी स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या सहकार क्षेत्रातील कार्याचाही उल्लेख करण्यात आला. शेतकरी व सहकार क्षेत्राशी संबंधित प्रश्नांना प्राधान्य देत जिल्हा बँकेच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला अधिक सक्षम करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली. महिला राखीव मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने नगर तालुका मतदारसंघातील निवडणुकीला वेग आला आहे.

