• Fri. Sep 4th, 2026

Mirrornews24

Marathi News

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेत दहीहंडीचा जल्लोष!

ByMirror

Sep 4, 2026
‘हाथी घोडा पालखी... जय कन्हैया लाल की!’ जयघोषाने दणाणला शाळा परिसर

राधा-कृष्णाच्या वेशभूषेतील चिमुकल्यांनी जिंकली उपस्थितांची मने; गवळणी, कृष्णजन्माच्या गीतांनी रंगला सोहळा


‘हाथी घोडा पालखी… जय कन्हैया लाल की!’ जयघोषाने दणाणला शाळा परिसर


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेत श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राधा आणि श्रीकृष्णाच्या वेशभूषेत सजलेल्या चिमुकल्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गवळणी, कृष्णजन्माची गीते तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि जल्लोषमय झाले.


कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी हिंदी-मराठी गीतांवर नृत्य, नाट्यरूप सादरीकरण आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. चिमुकल्यांच्या उत्स्फूर्त सादरीकरणाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. शाळेच्या अंगणात आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. फुले व रंगीबेरंगी फुग्यांनी परिसराची सुंदर सजावट करण्यात आली होती. दहीहंडी फोडण्याच्या क्षणी ‘हाथी घोडा पालखी… जय कन्हैया लाल की!’ या जयघोषाने संपूर्ण शाळा परिसर दणाणून गेला. लहानग्या गोविंदांच्या उत्साहात विद्यार्थी, शिक्षक आणि पालकही सहभागी झाले.


या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे उपस्थित होते. प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका लक्ष्मीताई आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक महादेव भद्रे, प्राथमिकच्या शिक्षिका मीनाक्षी खोडदे, उर्मिला साळुंके, सुजाता दोमल, सोनाली अनभुल, रूपाली वाबळे, कांचन मदने, भारती सुसरे, भाग्यश्री लोंढे, कविता हिरणवळे, इंदुमती दरेकर, पूनम धाडगे, रूपाली पांडुळे, सौ. जगताप, बिडवे मावशी तसेच विद्यार्थी, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


ज्ञानदेव पांडुळे म्हणाले की, दहीहंडी हा केवळ धार्मिक उत्सव नसून एकतेचे प्रतीक आहे. सण-उत्सवांच्या माध्यमातून विविधतेने नटलेल्या एकात्म भारताचे दर्शन घडते. समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचे काम अशा उत्सवांमधून होते. विद्यार्थ्यांमध्ये आपल्या संस्कृतीविषयी अभिमान निर्माण करण्याबरोबरच एकात्मतेची भावना रुजविण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले. हा उत्सव यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *