• Sun. Jul 5th, 2026

Mirrornews24

Marathi News

अहमदनगर सेंट्रल ॲडव्होकेट्‌स बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. फारूक बिलाल शेख

ByMirror

Jul 4, 2026
बार आणि बेंच यांच्यातील समन्वय वृद्धिंगत करणार-ॲड. फारूक शेख

बार आणि बेंच यांच्यातील समन्वय वृद्धिंगत करणार-ॲड. फारूक शेख


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर सेंट्रल ॲडव्होकेट्‌स बार असोसिएशनच्या नुकत्याच झालेल्या बैठकीदरम्यान ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. फारूक बिलाल शेख यांची अध्यक्षपदी निवड झाली. या बैठकीसाठी बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. अशोक कोठारी, ॲड. विश्‍वासराव आठरे पाटील, ॲड. पिंगळे, ॲड. ए.डी. चौधरी, ॲड. सुभाष काकडे, ॲड.के.एम. देशपांडे, ॲड. बिहाणी व इतर वकील बांधव उपस्थित होते.


निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना ॲड. फारूक बिलाल शेख यांनी बार असोसिएशनच्या सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानले. सदस्यांनी दाखविलेला विश्‍वास सार्थ ठरवत वकिलांच्या हिताचे रक्षण, बार आणि बेंच यांच्यात समन्वय वृद्धिंगत करणे, तरुण वकिलांना प्रोत्साहन देणे, न्यायालयीन सुविधा सुधारण्यासाठी प्रयत्न करणे तसेच बार असोसिएशनच्या सर्वांगीन विकासासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही त्यांनी दिली.

या निवडीबद्दल न्यायालयीन व विधी क्षेत्रातील मान्यवर, सहकारी वकील तसेच विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. ॲड. फारूक बिलाल शेख यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर सेंट्रल ॲडव्होकेट्‌स बार असोसिएशन अधिक सक्षम, सक्रिय व प्रगतिशील पध्दतीने वाटचाल करेल असा विश्‍वास विधी क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी व्यक्त केला आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *