• Mon. Jun 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

दिव्यांग विद्यार्थ्यांसह केंद्र स्तरावरील विशेष शिक्षकांचे सोडविले जाणार प्रश्‍न

ByMirror

Jun 21, 2026
उमेश शिंदे यांची जिल्हाध्यक्षपदी सर्वानुमते निवड

केंद्र स्तर विशेष शिक्षक सेलची स्थापना

उमेश शिंदे यांची जिल्हाध्यक्षपदी सर्वानुमते निवड


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दिव्यांग विद्यार्थ्यांचे शिक्षण, केंद्र स्तरावरील विशेष शिक्षकांचे प्रश्‍न आणि पालकांच्या विविध समस्यांना वाचा फोडण्यासाठी केंद्र स्तर विशेष शिक्षक सेल या नवीन सेलची अधिकृत स्थापना करण्यात आली आहे. केंद्रस्तर विशेष शिक्षक सेल पूर्णपणे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि त्यांच्याशी संबंधित घटकांच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध असणार आहे.


या सेल चे संपूर्ण कामकाज शिक्षक आमदार किशोर (भाऊ) दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली चालणार आहे. केंद्र स्तर विशेष शिक्षकांच्या आणि दिव्यांगांच्या प्रश्‍नांची जाण असणारे नेतृत्व पाठीशी असल्याने या सेनेच्या माध्यमातून अनेक प्रलंबित मागण्या मार्गी लागतील, असा विश्‍वास संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.


अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये या संघटनेचा विस्तार करण्यासाठी व कामाला गती देण्यासाठी केंद्र स्तर विशेष शिक्षक सेलच्या जिल्हाध्यक्षपदी उमेश शिंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. शहरातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित कार्यक्रमात आमदार किशोर दराडे यांनी उमेश शिंदे यांच्या निवडीबद्दल सत्कार करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजप शिक्षक सेलचे अध्यक्ष वैभव सांगळे, रामेश्‍वर ढगे यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.


विशेष शिक्षक सेल’ची प्रमुख उद्दिष्टे दिव्यांग मुलांना मुख्य प्रवाहातील दर्जेदार शिक्षण मिळवून देणे आणि त्यांच्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे राहणार आहे. केंद्र स्तरावर कार्यरत असणाऱ्या विशेष शिक्षकांच्या समस्या , नोकरीविषयक अडचणी आणि इतर हक्कांच्या लढ्यासाठी हे सेल प्रमुख व्यासपीठ म्हणून काम करेल. तसेच दिव्यांग पाल्यांच्या पालकांना योग्य मार्गदर्शन करणे, विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून केले जाणार आहे. शिंदे यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *