• Mon. Jun 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

हरदिन मॉर्निंग ग्रुपकडून भिंगारमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

ByMirror

Jun 21, 2026
योग आणि पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज -संजय सपकाळ

‘निरोगी शरीर, निरोगी पर्यावरण’चा संदेश; भिंगारच्या जॉगींग पार्कमध्ये योग साधकांचा उत्स्फूर्त सहभाग


योग आणि पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज -संजय सपकाळ


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगींग पार्क परिसर योगमय वातावरणाने दुमदुमून गेला. हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या योग दिन विशेष कार्यक्रमात ग्रुपच्या सदस्यांसह नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध योगासने, प्राणायाम आणि आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. विशेष म्हणजे महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती. योगाबरोबरच स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपण उपक्रम राबवून पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.


मागील अनेक वर्षांपासून योग आणि पर्यावरण संवर्धनाची चळवळ सातत्याने राबविणाऱ्या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने नागरिकांना निरोगी आणि सुदृढ जीवनासाठी नियमित योग करण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमात योगप्रशिक्षक प्रकाश देवळालीकर, विकास भिंगारदिवे, लविशा माखिजा, विनोद मुथा आणि हेमंत गोयल यांनी विविध योगासनांचे प्रात्यक्षिक सादर केले. प्रत्येक आसनाचा शरीरावर होणारा सकारात्मक परिणाम, त्याचे आरोग्यदायी फायदे तसेच नियमित योगाभ्यासाचे महत्त्व त्यांनी उपस्थितांना समजावून सांगितले.


योगसत्रादरम्यान उपस्थित सदस्य आणि नागरिकांनी विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणा करत निरोगी आरोग्यासाठी वर्षभर नियमित व्यायाम आणि योग करण्याचा निर्धार व्यक्त केला. योगामुळे शरीराची लवचिकता वाढते, मानसिक तणाव कमी होतो आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते, याची प्रचिती अनेकांनी यावेळी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी अनिल हळगावकर, अशोक पराते आणि ताराचंद ठोकळ यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष लागवड ही काळाची गरज असल्याचे सांगत उपस्थितांनी वृक्षसंवर्धनाची शपथ घेतली. त्यानंतर परिसरात स्वच्छता अभियान राबवून स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

या कार्यक्रमास संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, रमेश वराडे, सचिन चोपडा, जहीर सय्यद, सर्वेश सपकाळ, दिलीप ठोकळ, सुभाष पेंढुरकर, इवान सपकाळ, अविनाश पोतदार, सुंदरराव पाटील, अनिलराव सोळसे, निजाम पठाण, मुन्ना वाघस्कर, संजय भिंगारदिवे, अमीन धारानी, सतीश माखीजा, विशाल बोगावत, प्रांजली सपकाळ, सुरेखा आमले, सत्यशीला खराडे, मनीषा शिंदे, लविशा माखिजा, संगीता सपकाळ, मनिषा बोगावत, सौ. देवराईकर, गुलशन धाराणी, ज्योतीताई भिंगारदिवे, अशोक लोंढे, रामनाथ गर्जे, अभिजीत सपकाळ, रतन मेहेत्रे, दिलीप गुगळे, दीपक धाडगे, मनोहर दरवडे, दीपक घोडके, सुधीर कपाळे, जयराम मेहतानी आदी सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, शरीराचे आणि पर्यावरणाचे आरोग्य जपण्यासाठी योग आणि वृक्षारोपण ही काळाची गरज बनली आहे. मागील पंचवीस वर्षांपासून हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून आरोग्य चळवळ सातत्याने राबविली जात आहे. ग्रुपचे पाचशेपेक्षा अधिक सदस्य असून ते दररोज सकाळी भिंगारच्या जॉगींग पार्कमध्ये एकत्र येऊन योगाभ्यास करतात.


ते पुढे म्हणाले की, योग ही प्राचीन भारताची जगाला मिळालेली अमूल्य देणगी आहे. योग हा केवळ व्यायामाचा प्रकार नसून तन, मन आणि आत्म्याचा समतोल साधणारा जीवनमार्ग आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात शारीरिक आणि मानसिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी योग अत्यंत आवश्‍यक आहे. नागरिकांनी वर्षभर नियमित व्यायाम आणि योग करून निरोगी राहावे तसेच पर्यावरण संवर्धनासाठीही योगदान देऊन देशसेवेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
सचिन चोपडा म्हणाले की, धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमध्ये योग हा निरोगी आरोग्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. नियमित योगाभ्यासामुळे शरीर तंदुरुस्त राहते, मन प्रसन्न राहते आणि आत्मविश्‍वास वाढतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर योगाला मिळालेली मान्यता ही भारतासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.


कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अविनाश जाधव, सरदारसिंग परदेशी, दशरथ मुंडे, नवनाथ वेताळ, विलासराव तोतरे, राजू कांबळे, योगेश चौधरी, अनंत सदलापूर, शशिकांत पवार, सुहास देवराईकर, प्रज्योतसिंग सागु, अजय भिंगारदिवे, संजय बकरे, मारुती खराडे, दिपक बडदे, विशाल भामरे, आनंद भणगे, संजय शिंगवी, विनोद खोत आणि दीपक अमृत यांनी विशेष परिश्रम घेतले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *