• Tue. Jun 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

पै. नाना डोंगरे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार प्रदान

ByMirror

May 5, 2026
चरहोली बुद्रुक, पुणे येथे सामाजिक कार्याचा सन्मान

चरहोली बुद्रुक, पुणे येथे सामाजिक कार्याचा सन्मान

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सोजाई आदिवासी महिला विकास फाउंडेशनच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. आळंदी रोड, चरहोली बुद्रुक (जि. पुणे) येथे हा सन्मान सोहळा पार पडला. दिघी येथील पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघ यांच्या हस्ते डोंगरे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मानपत्र व स्मृतीचिन्ह पुरस्काराचे स्वरुप होते.


या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रपती पोलीस पदक विजेते सिताराम नरके, कार्यक्रमाचे अध्यक्ष उमेश चव्हाण, फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. प्रशांत चव्हाण, सचिव जयश्री सोनवणे, गझलकार रज्जाक शेख, आनंदा साळवे, अभिनेते अतुल गुंजाळ आदी उपस्थित होते.
स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तसेच ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी नगर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात ग्रामीण भागात विविध क्षेत्रांत सातत्यपूर्ण सामाजिक कार्य उभारले आहे. संस्थेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, साहित्य व धार्मिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. ग्रामीण भागात वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनासाठी विविध उपक्रम राबवून पर्यावरण संवर्धनाबाबत व्यापक जनजागृती निर्माण केली आहे.


स्त्री जन्माचे स्वागत, स्वच्छता अभियान, महिला सक्षमीकरण, मतदार जागृती, जलसंधारण जनजागृती मोहीम, रक्तदान शिबिरे यांसारखे उपक्रम व्यापक स्वरूपात राबविले जात आहेत. युवकांसाठी व्यसनमुक्ती संदर्भातील कार्यक्रम, तसेच गावपातळीवर आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून ग्रामस्थांना आरोग्यसेवा देण्याचे कार्यही संस्थेमार्फत सुरू आहे. विविध स्पर्धा, महिला बचत गट मेळावे, युवा संमेलनांच्या आयोजनातून समाजाला सकारात्मक दिशा देण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे.


साहित्य चळवळीला चालना देण्यासाठी पै. नाना डोंगरे यांनी आठ राज्यस्तरीय काव्य संमेलने तसेच चार ग्रामीण मराठी साहित्य संमेलने यशस्वीपणे आयोजित केली आहेत. त्यांच्या या बहुआयामी सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *