अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नागरदेवळे (ता. नगर) वच्छलाबाई दत्तात्रय बोरुडे (वय 92 वर्षे) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्या प्रगतशील शेतकरी व धार्मिक आणि मनमिळावू होत्या. उद्योजक बाबासाहेब अशोक बोरुडे व राजेंद्र बोरुडे यांच्या त्या आजी तर नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांच्या त्या चुलती होत्या. त्यांचा अंत्यविधी बुऱ्हाणनगररोड येथील बोरुडे मळा येथे शोकाकुळ वातावरणात पार पडला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्यामागे नात, सुना, नातू, नातवंडे असा परिवार आहे.
वच्छलाबाई बोरुडे यांचे निधन
