खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने 19 वर्ष वयोगट मुले-मुली यांची जिल्हा निवड चाचणी व अजिंक्यपद स्पर्धा शनिवारी दि. 6 डिसेंबर रोजी सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय राहुरी कृषी विद्यापीठ येथे होणार आहे. सकाळी 10 वाजता या स्पर्धेचे उद्घाटन होणार असून, जिल्ह्यातील जास्तीत जास्त टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन संघटनेचे जिल्हा सचिव तथा राज्य टेनिस क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार घन:श्याम सानप, अध्यक्ष केशव नागरगोजे व खजिनदार संदीप घावटे यांनी केले आहे.
या स्पर्धेद्वारे नगर जिल्ह्याचा टेनिस क्रिकेटचा संघ जाहीर करण्यात येणार आहे. जिल्ह्याचा संघ सातारा येथे 18 डिसेंबर ते 21 डिसेंबर दरम्यान होणार होणाऱ्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी रवाना होणार आहे. यावर्षीपासून दहावी व बारावीचे खेळाडूंना बोर्ड गुण मिळण्यासाठी सुद्धा हा खेळ पात्र ठरला आहे. या स्पर्धेला येताना सर्व खेळाडूंना जन्मदाखला आणि धारकार्ड सोबत आनण्याचे अनिर्वाय आहे. अधिक माहितीसाठी घनश्याम सानप यांना 9850744576 व 8668820237 या मोबार्इल क्रमांकावर संपर्क साधण्याचे म्हंटले आहे.
