• Wed. Jul 1st, 2026

Mirrornews24

Marathi News

शनेश्‍वर पवार यांच्या उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांचा एकमुखी पाठिंबा

ByMirror

Nov 25, 2025
दरेवाडी गटातून तरुण व उच्चशिक्षित नेतृत्वासाठी कार्यकर्त्यांची मागणी

दरेवाडी गटातून तरुण व उच्चशिक्षित नेतृत्वासाठी कार्यकर्त्यांची मागणी

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- वाकोडी (ता. नगर) येथील ग्रामपंचायत सदस्य शनेश्‍वर शंकर पवार(सर) यांनी दरेवाडी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक कार्यकर्त्यांकडून होत आहे. अलीकडेच पार पडलेल्या समर्थकांच्या बैठकीत पवार यांच्या नावाची उमेदवारीसाठी एकमुखी मागणी कायकर्त्यांनी केली. या बैठकीत गावातील अनेक युवा कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.


बैठकीदरम्यान शनेश्‍वर पवार (सर) यांनी आगामी निवडणुकीसाठी तयारी दर्शवली असून, जनतेच्या सेवेसाठी आपल्या ताकदीने योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला. ग्रामपंचायत सदस्य पवार (सर) यांनी वाकोडी गावात अनेक विकासात्मक कामे पार पाडली आहेत. विकासात्मक कामातून त्यांनी स्थानिकांमध्ये विशेष विश्‍वास निर्माण केला आहे.


पवार यांचे पंचक्रोशीत असलेला दांडगा जनसंपर्क व विविध विकासात्मक कामे लार्गी लावण्याचा हातखंडा या कार्यशैलीमुळे त्यांचा प्रभाव केवळ गावापुरता मर्यादित न राहता संपूर्ण दरेवाडी गटात वाढला आहे. तरुण कार्यकर्त्यांशी असलेला त्यांचा संवाद, संघटनात्मक कौशल्य आणि लोकाभिमुख दृष्टिकोन यामुळे त्यांच्या उमेदवारीला स्थानिक स्तरावर चांगला प्रतिसाद मिळत आहे.


बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी दरेवाडी गटात परिवर्तनासाठी तरुण नेतृत्वाची गरज आहे, असे मत मांडले. या पार्श्‍वभूमीवर शनेश्‍वर पवार (सर) यांचे नाव पुढे आले असून, त्यांनी या आव्हानासाठी तयारी दर्शवली आहे. गावातील व वरिष्ठ कार्यकर्त्यांचा विश्‍वास आहे की, पवार हे तरुण व उच्चशिक्षित असून, त्यांनी ग्रामविकासाबरोबरच धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही सातत्याने योगदान दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली दरेवाडी गटात विकासाचा नवा अध्याय सुरू होणार असल्याचा विश्‍वास व्यक्त केला. त्यांच्या उमेदवारीमुळे दरेवाडी गटातील निवडणुकीची रंगत वाढणार आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *