17 वर्षे वयोगट मुली व 14 वर्ष वयोगटातील मुलांचा संघ विजयी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालया मार्फत घेण्यात आलेल्या शहर शालेय कुराश स्पर्धेत रुपीबाई मोतीलालजी बोरा न्यू इंग्लिश स्कूलच्या खेळांडूनी घवघवीत यश संपादन केले. शाळेच्या 17 वर्षे वयोगट मुली व 14 वर्ष वयोगटातील मुलांच्या संघाने अहिल्यानगर शहराचे विजेतेपद पटकावले.
मुलींमध्ये एकूण 9 खेळाडूनी व मुलांमध्ये एकूण 10 खेळाडूंनी स्पर्धत प्रभावी कामगिरी करत सुवर्णपदक प्राप्त केले. उत्कृष्ट खेळाने स्पर्धेत छाप पाडली. 25 नोव्हेंबरला अहिल्यानगर येथील वाडियापार्क क्रीडा संकुलमध्ये होणाऱ्या पुणे विभागीय कुराश स्पर्धेसाठी या संघांची निवड झाली आहे.
14 वर्षाआतील मुलीमध्ये धनश्री दहिवळ, सिमरन शेख, श्रावणी साळुंके आणि 14 वर्षीआतील मुलांमध्ये ओम लकडे, युवराज आव्हाड, ओम दहिफळे, सार्थक तनपुरे, यश जाधव यांचा समावेश आहे.
तसेच 17 वर्षीआतील मुलींमध्ये आरुषी लांडगे, आरोही खवळे, प्रिया खाकाळ, यशश्री पोळ आणि 17 वर्षा आतील मुलांमध्ये आयुष बागडे, वीर घोडे, 19 वर्षाआतील मुलींमध्ये दिव्या मेठे, नक्षत्रा कुंटला, 19 वर्षा आतील मुलांमध्ये वीर साळवे, विराज खरपुडे यांचा सहभाग होता. या खेळाडूंना क्रीडा शिक्षिका अंजली देवकर व अमोल धानापूर्ण यांचे मार्गदर्शन लाभले.
या स्पर्धेतील खेळाडूंचे संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायातार्इ फिरोदिया, सहकार्यवाह गौरव फिरोदिया, नियामक मंडळाचे चेअरमन अशोक मुथा, शाळा समितीचे चेअरमन भूषण भंडारी, शाळा समिती सदस्य ॲड. गौरव मिरीकर, शाळेचे मुख्याध्यापक अजय बारगळ, उपमुख्याध्यापक आर.एन. भांड, पर्यवेक्षक व्ही.बी गिरी यांनी अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
