• Tue. Oct 14th, 2025

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त मुलीच्या जन्माचे स्वागत

ByMirror

Oct 13, 2025

मुलगी ही दोन्ही घरात प्रकाश पसरवते -सुनिल सकट

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त शहरात मुलीच्या जन्माचे स्वागत करून लेक वाचवा, लेक वाढवा! चा संदेश देण्यात आला. महाराष्ट्र शासनाचा समाजभूषण पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते सुनील सकट यांच्या पुढाकाराने नगर-कल्याण रोड, नालेगाव येथील एका नवजात बालिकेच्या मातेला पेढे भरवून आणि बेबी किट भेट देऊन तिचे अभिनंदन करण्यात आले.


या वेळी बालिकेची आई सुरेखा बोरुडे आणि वडील अमोल बोरुडे यांना कन्यारत्न झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.कार्यक्रमास कमलबाई चांदणे, वंदना सकट, सुशीलाबाई सकट, आरती सकट आदी मान्यवर उपस्थित होत्या.


सुनील सकट यांनी बोरुडे दाम्पत्यास पेढे भरवून शुभेच्छा दिल्या आणि बालिकेसाठी मच्छरदानी, कपडे, बेबी साबण, पावडर, टॉवेल आदी वस्तूंचा समावेश असलेले बेबी केअर किट भेट म्हणून दिले. सकट म्हणाले की, मुलगा आणि मुलगी यात काहीच फरक नाही. उलट मुलगी ही दोन्ही घरात प्रकाश पसरवते. जन्मदात्या घरात प्रेमाचा दीप आणि सासरी संस्कारांचा दीप ती प्रज्वलीत करते. समाजाने मुलींच्या जन्माचा उत्सव साजरा करावा, कारण ती फक्त कुटुंबाचं नव्हे तर समाजाचंही भविष्य घडवते. मुलगी म्हणजे कोमलता, परंतु तीच ताकतही आहे. ती आई, बहीण, पत्नी आणि मुलगी या सर्व भूमिका जबाबदारीने निभावते. जर प्रत्येक मुलीच्या जन्माचे स्वागत अशाच सन्मानाने केले, तर स्त्रीभ्रूणहत्या, भेदभाव आणि अन्याय यांना समाजातून कायमचे हद्दपार करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *