स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत मेरा युवा भारत व उडाण फाउंडेशनचा उपक्रम
स्वच्छता ही निरोगी आयुष्याची पहिली पायरी -ॲड. आरती शिंदे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त नगर तालुक्यातील रतडगाव येथे ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले. मेरा युवा भारत व उडाण फाउंडेशन यांच्या वतीने स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत गावातील सार्वजनिक ठिकाणे, सभा मंडप व परिसर स्वच्छ करण्यात आला.
या उपक्रमात उडाण फाउंडेशनच्या अध्यक्षा ॲड. आरती शिंदे, मनोहर शिंदे, दत्तात्रय बनसोडे, दत्तात्रय वाघुले, गणेश बनसोडे, अल्विन बनसोडे, रामदास सुर्जे, प्रशांत बनसोडे, चंद्रकांत थोरात, गौराम जाधव, शरद बनसोडे, गोकुळ बनसोडे आदींसह ग्रामस्थ सहभागी झाले होते.
ॲड. आरती शिंदे म्हणाल्या की, स्वच्छता ही निरोगी आयुष्याची पहिली पायरी आहे. तिची सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासून केली पाहिजे. वैयक्तिक स्वच्छता आणि परिसर स्वच्छता हे समाजासाठी अत्यावश्यक आहे. अनेक आजारांना आळा घालण्यासाठी स्वच्छता राखणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. गांधीजींनी दिलेला स्वच्छतेचा संदेश आपण प्रत्यक्ष कृतीतून गावागावात पोहोचविण्याचे त्यांनी आवाहन केले. या उपक्रमासाठी मेरा युवा भारतचे जिल्हा समन्वय अधिकारी सत्यजित संतोष, रमेश गाडगे तसेच जय असोसिएशन ऑफ एनजीओचे ॲड. महेश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. ग्रामस्थ व युवकांनी मिळून गावातील सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करून गांधी जयंतीचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून साकारला.