राहुल चव्हाण व शुभम भळगट ठरले ई-बाईकचे भाग्यवान विजेत; आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते काढण्यात आली सोडत
ए.एच. पोखरणा ज्वेलर्सने दागिन्यांच्या क्षेत्रात मोठी विश्वासार्हता निर्माण केली -आ. संग्राम जगताप
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील प्रसिद्ध सोने दागिने व्यवसायिक ए.एच. पोखरणा ज्वेलर्स यांच्या सर्जेपुरा व सथ्था कॉलनी येथील दालनात खास श्रावण मासनिमित्त सोने खरेदीवर विशेष योजना राबविण्यात आली. यामध्ये ग्राहकांना देण्यात आलेल्या कुपनची सोडत आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते काढण्यात आली. यामध्ये सर्जेपुरा शाखेतून भाग्यवान विजेते राहुल चव्हाण व सथ्था कॉलनी येथील शाखेतून भाग्यवान विजेते शुभम भळगट हे भाग्यवान विजेते ठरले. विजेत्यांना प्रत्येकी ई-बाईकचे भव्य बक्षीस जाहीर करण्यात आले.
स्टेशन रोड, सथ्था कॉलनी येथील ए.एच. पोखरणा शाखेत झालेल्या भाग्यवान विजेत्यांच्या सोडत कार्यक्रमासाठी हिरालाल पोखरणा, अनिल पोखरणा, हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, मर्चंट बँकेचे संचालक संजीव गांधी, संजय चोपडा, संजय बोरा, सुभाष बायड, विकी जगताप, सुभाष पोखरणा, हिरालाल चंगेडिया, रवींद्र गुजराथी, पेमराज पोखरणा, प्रमोद मुनोत, वसंत पोखरणा, अमित पोखरणा, आकाश पोखरणा, डॉ. अतुल खालकर, पार्श पोखरणा आदी मान्यवर उपस्थित होते.
अनिल पोखरणा यांनी सांगितले की, श्रावण मासात राबविलेल्या योजनेत 2100 रुपये प्रती तोळा (10 ग्रॅम) इतकी थेट सूट सोन्याच्या खरेदीवर देण्यात आली होती. सोने खरेदी करणाऱ्यांना कुपन देऊन भाग्यवान विजेत्यांसाठी ई-बाईकचे बक्षीस ठेवण्यात आले होते. प्रत्येक खरेदीवर आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. डायमंड दागिन्यांवर मजुरी पूर्णपणे माफ करण्यात आली होती. हॉलमार्क प्रमाणित सोन्याच्या दागिन्यांवर 100% एक्स्चेंज स्कीम लागू करण्यात आली होती. या योजनेला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याची माहिती त्यांनी दिली.
नवरात्र पासून ते दिवाळी पाडव्यापर्यंत नवीन योजना त्यांनी जाहीर केली. जितके ग्रॅम सोने खरेदी, तितके ग्रॅम चांदी मोफत! आणि स्क्रॅच कुपनवर मजुरीत भरघोस सुट देण्याचे जाहीर करण्यात आले. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, ए.एच. पोखरणा ज्वेलर्सने नगर शहरात दागिन्यांच्या क्षेत्रात मोठी विश्वासार्हता निर्माण केली आहे. सोने, चांदी व हिरे दागिन्यांमध्ये ते सतत नवनवीन व आकर्षक डिझाईन्स आणून ग्राहकांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देतात. ग्राहकांना योग्य दरात, कमी मजुरीत आणि उच्च प्रतीची सेवा मिळावी हा त्यांचा ध्यास आहे. सण-उत्सवाच्या काळात खास योजना व ऑफर जाहीर करून त्यांनी ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण केला असल्याचे त्यांनी सांगितले.
अमित पोखरणा व आकाश पोखरणा यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. नगर शहरात सर्वात कमी मजुरी दरही याच दालनात आहे.
महिलांना चोखंदळपणे त्यांच्या मनातील डिझाईनचे सुवर्ण अलंकार याठिकाणी निश्चितच मिळतात. 5 ग्रॅमपासून ते 150 ग्रॅमपर्यंत वजनाच्या दागिन्यांची रेंज येथे आहे. दागिने तसेच हिऱ्यांची अत्युच्च गुणवत्ता याठिकाणी ग्राहकांना मिळतेे. डायमंडचे स्वतंत्र काउंटर दालनात आहे. चांदीचे पैंजण तसेच अन्य दागिने, भेट वस्तू, देवीदेवतांच्या मूर्ती, पूजा साहित्य, चांदीची नाणी दालनात आहेत. नवनवीन व्हरायटी, शुध्द, सुंदर दागिने पोखरणा ज्वेलर्सची वैशिष्ट्य असल्याचे सांगण्यात आले आहे.