• Wed. Jul 1st, 2026

Mirrornews24

Marathi News

शिक्षक आमदार किशोर दराडे यांची शाळांना प्रोजेक्टर भेट

ByMirror

Sep 13, 2025
शिक्षक व शिक्षकेतरांशी संवाद साधून जाणून घेतल्या समस्या

शिक्षक व शिक्षकेतरांशी संवाद साधून जाणून घेतल्या समस्या

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी शहरातील विविध शाळांना भेट देत शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी डिजीटल शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेले प्रोजेक्टर वाटप करण्यात आले.


आमदार दराडे यांनी केडगाव येथील अंबिका विद्यालय, भाग्योदय विद्यालय, महाराणी ताराबाई कन्या विद्यालय तसेच शहरातील भाऊसाहेब फिरोदिया विद्यालय आणि सिताराम सारडा विद्यालयाला भेट दिली. या शाळांना प्रोजेक्टरचे वाटप करून डिजीटल वर्गांचा दर्जा उंचावण्याचा व विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरणानुसार अद्यावत शिक्षण देण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.


यावेळी नगर तालुका मुख्याध्यापक संघटनेचे सचिव संभाजी पवार, शिक्षक नेते वैभव सांगळे, मुख्याध्यापक उत्तर विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, शहर मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष ज्ञानदेव बेरड, अशोक आव्हाड, राज्य गणित संघटनेचे अध्यक्ष संजयकुमार निकरड, हिंद सेवा मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक अजितशेठ बोरा, पेमराज सारडा कॉलेजचे चेअरमन डॉ. पारस कोठारी, आमदार दराडे यांचे स्वीय सहाय्यक हरीष मुंढे, गोवर्धन पांडुळे आदी मान्यवर उपस्थित होते.


आमदार किशोर दराडे म्हणाले की, आजच्या युगात डिजीटल शिक्षणाची गरज वाढली आहे. ग्रामीण व शहरी शाळांमधील विद्यार्थी स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी आधुनिक साधनसंपत्ती आवश्‍यक आहे. म्हणूनच प्रत्येक शाळेत डिजीटल वर्ग निर्माण करणे हा आमचा संकल्प आहे. शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी अद्यावत तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरत आहे. विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देण्यासाठी शिक्षकांना प्रयत्नशील राहण्याचे त्यांनी आवाहन केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *